खेळाडूंना सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:01+5:302021-09-19T04:40:01+5:30

सातारा : राज्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा संकुलांच्या माध्यमातून खेळाडूंना पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला ...

Government's emphasis on providing facilities to players: Guardian Minister | खेळाडूंना सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री

खेळाडूंना सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री

Next

सातारा : राज्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा संकुलांच्या माध्यमातून खेळाडूंना पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.

साताऱ्यात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट व्हावे, अशी खेळाडूंची असलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे. चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा संकुलातील खेळाडूंच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी सिंह यांनी सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट तयार करणाऱ्या पथकाचे अभिनंदन करुन क्रीडा संकुलात आणखी सुविधा वाढविणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.

फोटो नेम : १८ डीआयओ

फोटो ओळ : सातारा येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Government's emphasis on providing facilities to players: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.