अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासन सकारात्मक : देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:42+5:302021-09-15T04:44:42+5:30
कोयनानगर येथे अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांसाठी उभारण्यात येत आलेल्या तात्पुरत्या शेडची पाहणी गृहराज्यमंत्री देसाई यांनी केली. यावेळी ते बोलत होते. ...
कोयनानगर येथे अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांसाठी उभारण्यात येत आलेल्या तात्पुरत्या शेडची पाहणी गृहराज्यमंत्री देसाई यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोक पाटील, शशिकांत जाधव, शैलेंद्र शेलार, भरत साळुंखे, अभिजित पाटील, तहसीलदार योगेश टोमपे, विजय बाकाडे, धोंडीराम बाकाडे, संजय बाकाडे, उत्तम बाकाडे उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची एकनाथ शिंदे यांचे मी पाहणी केली. त्यावेळी कोयना वसाहतीतील रिकाम्या निवासी इमारतींची तातडीने दुरुस्ती करून त्यातील प्रातिनिधिक स्वरुपात ठराविक घरांचा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी बाकाडे कुटुंबियांना निवासासाठी देण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांची पूर्ण घरे जमिनीदोस्त झाली आहेत,
तसेच सिडको आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून घरांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले आहे. कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी लागणाऱ्या जागा निश्चित करण्याचे काम महसूल विभागाकडून युध्दपातळीवर सुरू आहे.
पुनर्वसनासाठी खासगी जागा खरेदी करून त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारी शासनाने ठेवली आहे. जागा घेण्यासाठी तसेच पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधा देण्याकरिता निधी देण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मान्य केले आहे.’