ग्रेड सेपरेटरचे उदघाट्न आता २९ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:38 AM2021-01-25T04:38:55+5:302021-01-25T04:38:55+5:30

सातारा : सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन २६ जानेवारी रोजी होणार होते पण २९ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन ...

Grade Separator will be inaugurated on January 29 | ग्रेड सेपरेटरचे उदघाट्न आता २९ जानेवारीला

ग्रेड सेपरेटरचे उदघाट्न आता २९ जानेवारीला

Next

सातारा : सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन २६ जानेवारी रोजी होणार होते पण २९ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. त्यावेळी सर्वांच्या उपस्थितीत ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

या ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मोहनराव कदम, आमदार प्रा.जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर‍ सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, पुणे प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता आबासाहेब चौगुले, सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता स. गो. मुनगिलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, सहायक अभियंता राहुल अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Web Title: Grade Separator will be inaugurated on January 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.