जिल्ह्यातील थंडीत हळू हळू वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:39 AM2021-01-23T04:39:26+5:302021-01-23T04:39:26+5:30
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात झाली. ऐन दिवाळीत जिल्ह्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते, तर त्यानंतर तापमानात ...
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात झाली. ऐन दिवाळीत जिल्ह्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते, तर त्यानंतर तापमानात वाढ होत गेली. काही दिवस तापमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे थंडी कमी झालेली, तर डिसेंबर महिन्यात किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. दोन वर्षातील हे नीचांकी तापमान ठरले. तसेच जानेवारी महिना सुरू झाल्यापासून थंडी आणखी कमी झाली. काही दिवस २० अंशाच्या वर पारा होता. असे असतानाच चार दिवसांपासून किमान तापमान कमी होत चालले आहे. यामुळे हळू हळू थंडीत वाढ होत चालली आहे.
चाैकट :
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. १५ जानेवारी १५.०९ , दि. १६- १६.०७, दि. १७- १८, दि. १८- २०.०६, दि. १९- १८.०२, दि. २०- १७.०४, दि. २१- १६ आणि दि.२२ जानेवारी- १५.