पदवीधर-शिक्षक निवडणूक : कऱ्हाडात रांगा लावून मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:12 PM2020-12-01T12:12:32+5:302020-12-01T12:14:24+5:30

Pune, Vidhan Parishad Election, karad, satara, विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी ८ ते १0 या दोन तासांच्या कालावधीत ५ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधरसाठी ४ हजार २५८ मतदारांनी तर शिक्षकसाठी ८२१ मतदारांनी मतदान केले. सकाळच्या वेळेत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

Graduate-Teacher Election: Voting by queuing in Karhada | पदवीधर-शिक्षक निवडणूक : कऱ्हाडात रांगा लावून मतदान

कऱ्हाड येथील यशवंत हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. (अस्लम मुल्ला)

Next
ठळक मुद्देपदवीधर-शिक्षक निवडणूक : कऱ्हाडात रांगा लावून मतदान सकाळी १0 वाजेपर्यंत ५ हजार ७९ मतदारांनी बजावला हक्क

सातारा : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी ८ ते १0 या दोन तासांच्या कालावधीत ५ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधरसाठी ४ हजार २५८ मतदारांनी तर शिक्षकसाठी ८२१ मतदारांनी मतदान केले. सकाळच्या वेळेत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

जिल्ह्यातील १७६ मतदान केंद्रांवर आज (मंगळवार) सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात झाली. कऱ्हाडात यशवंत हायस्कूलसह इतर काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे पहायला मिळाले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सकाळी आझाद कॉलेजच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.

सयाजी कॉलेज, शिवाजी कॉलेज या ठिकाणी देखील मतदानासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. विशेषत: पदवीधर मतदारांमध्ये उत्साह जाणवला. शिक्षक मतदारसंघामधील ७ हजार ७११ मतदारांपैकी सकाळी १0 वाजेपर्यंत ८२१ मतदारांनी म्हणजे १0.६५ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये ६९७ पुरुष तर १२४ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी ५९ हजार ७१ मतदारांपैकी ४ हजार २५८ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाच्या ७.२१ टक्के मतदान झाले. मतदानाच्या ठिकाणी प्रशासनातर्फे विशेष उपाययोजना राबविल्याने अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

प्रश्न सोडविण्याच्या पदवीधरांच्या अपेक्षा

अनेकांनी पहिल्यांदाच मतदान करायला मिळाल्याचे सांगितले. तसेच निवडून येणाऱ्या आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवावेत, अशा प्रतिक्रिया देखील नवमतदारांनी व्यक्त केल्या. तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे मत देखील काही पदवीधारकांनी व्यक्त केले.
 

Web Title: Graduate-Teacher Election: Voting by queuing in Karhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.