धान्य दुकानदारांचा कोरोनाविरुद्ध लढ्याला हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:41 AM2021-05-20T04:41:57+5:302021-05-20T04:41:57+5:30
वाई : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, त्यापैकी बरेच रुग्ण कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोविड ...
वाई : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, त्यापैकी बरेच रुग्ण कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल होत असतात. त्यापैकी बरेच रुग्ण हे कोरोना विषाणू प्रादुर्भावाची मध्यम ते तीव्र लक्षणे असणारे व ऑक्सिजनची आवश्यकता असणारे असतात. अशा रुग्णांना ऑक्सिजनसोबतच आवश्यक असणारी औषधे व इंजेक्शन्स यांची कवठे आरोग्य केंद्र येथील कोविड सेंटरमध्ये कमतरता असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार व तालुका आरोग्य विभागाच्या मागणीनुसार वाई तालुका महसूल प्रशासनातर्फे रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी व १ महिना पुरतील एवढी औषधे व इंजेक्शन्स उपलब्ध करून उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
औषधे व इंजेक्शन्ससाठी लागणारी रक्कम ही वाई उपविभागीय अधिकारी कार्यालयातील व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच वाई तालुका तलाठी व मंडल अधिकारी संघटना त्याचप्रमाणे वाई तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांनी वर्गणी काढून जमा केली आहे.