Satara: ग्रामपंचायतीचे शिपाई बनले ग्रामसेवक, विस्तार अधिकारी

By नितीन काळेल | Published: December 9, 2023 06:47 PM2023-12-09T18:47:45+5:302023-12-09T18:48:21+5:30

सातारा : ग्रामपंचायतीच्या शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी अशा १४ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील विविध पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी ...

Gram panchayat constables become gram sevaks, extension officers in Satara | Satara: ग्रामपंचायतीचे शिपाई बनले ग्रामसेवक, विस्तार अधिकारी

Satara: ग्रामपंचायतीचे शिपाई बनले ग्रामसेवक, विस्तार अधिकारी

सातारा : ग्रामपंचायतीच्या शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी अशा १४ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील विविध पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी १० टक्के कोट्यातून त्यांची ही नियुक्ती झाली. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदी पदांवर नेमणूक झालेली आहे. तर वर्ग चारमधील चाैघांना प्रशासनच्या कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नती मिळाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. तर सामान्य प्रशासन विभागामार्फत ग्रामपंचायत कर्मचारी १० आरक्षणामधून ही नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार १४ जणांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रशासनमधील कनिष्ठ सहायकपदी चाैघेजण नियुक्त झाले.

तर सांख्यिकी विस्तार अधिकारी एक, लेखामध्ये वरिष्ठ सहायक एक, चाैघांना ग्रामसेवक तर पशुधन पर्यवेक्षकपदीही चारजणांची नियुक्ती झालेली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असणारे आणि पदोन्नतीस पात्र चाैघांनाही पुढील पदावर नियुक्ती मिळाली आहे. त्यांना प्रशासनमध्ये कनिष्ठ सहाय्यकपदी नियुक्ती मिळाली.


ग्रामपंचायत १० टक्के कोट्यातून विविध संवर्गात १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. तर तर वर्ग चारमधीलही चाैघांची वरिष्ठ सहायकपदी पदोन्नती झाली आहे. या कर्मचाऱ्यांनी आता उत्कृष्ट कामकाज करुन जिल्हा परिषदेचा नावलाैकिक वाढवावा. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Gram panchayat constables become gram sevaks, extension officers in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.