ग्रामसभा ऑनलाइन.. राजकीय कार्यक्रम ऑफलाइन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:41+5:302021-09-10T04:46:41+5:30
आदर्की : फलटण तालुक्यात कोरोनाची संख्या आटोक्यात येत नसल्याने गावच्या विकासाच्या मुद्द्यावर होणाऱ्या ग्रामसभेला गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ ...
आदर्की : फलटण तालुक्यात कोरोनाची संख्या आटोक्यात येत नसल्याने गावच्या विकासाच्या मुद्द्यावर होणाऱ्या ग्रामसभेला गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ग्रामसभा ऑनलाइन घेतल्या जात आहेत; परंतु निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष मात्र ऑफलाइन उद्घाटने, भूमिपूजन कार्यक्रम घेत असल्याचे चित्र फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षापासून ग्रामसभा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ऑनलाईन ग्रामसभेला परवानगी देण्यात आली. गत महिन्यापासून ऑफलाइन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली. पण ज्या गावात कोरानाचे रुग्ण होत आहे. त्या ठिकाणी ऑनलाइन ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे ग्रामसभा ऑनलाईन झाल्या; पण कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राजकीय कार्यक्रम गत दीड वर्षापासून थंडावले होते; पण विकासाची कामे सुरू होती आणि जिल्हा बँक, सोसायट्या, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर रखडलेली उद्घाटन, भूमिपूजन आदी कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा व शेकडो राजकीय कार्यकर्ते व शासकीय अधिकारी, कर्मचारी ही उपस्थित राहत असल्याने ग्रामसभा ऑनलाइन अन् राजकीय कार्यक्रम ऑफलाइन होत असल्याचे चित्र फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे.