वाढे फाटा परिसर बनलाय ‘विवस्त्र मृतदेहांचा झोन’

By Admin | Published: July 11, 2016 12:59 AM2016-07-11T00:59:35+5:302016-07-11T00:59:35+5:30

पोलिसांचा तपास ‘बेवारस’ : सातारकरांमध्ये चर्चेला उधाण; पाच मृतदेह सापडल्याने तर्कवितर्क

Grasshopper area becomes 'zombie of dead body' | वाढे फाटा परिसर बनलाय ‘विवस्त्र मृतदेहांचा झोन’

वाढे फाटा परिसर बनलाय ‘विवस्त्र मृतदेहांचा झोन’

googlenewsNext

दत्ता यादव ल्ल सातारा
आठवड्यातून एकदा तरी कुठे ना कुठे बेवारस मृतदेह पोलिसांना सापडतच असतो, त्यामुळे पोलिसांना त्याचे फारसे काही वाटत नाहीय; परंतु गेल्या दोन महिन्यांत वाढे फाटा परिसरात तब्बल पाचजणांचे बेवारस मृतदेह सापडल्याने अनेक तर्कवितर्क सुरू झाले. त्यातच एकाही मृतदेहाची आजपर्यंत ओळख पटली नसल्याने पोलिसांचा तपासही आता ‘बेवारस’ झालाय. वाढे फाटा विवस्त्र मृतदेहांचा झोन बनत असल्याने पोलिसही संभ्रमात पडले आहेत.
वाढे फाटा येथून महामार्ग जात असल्याने नेहमी वर्दळ असते; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हे ठिकाण वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. सुरुवातीला मे महिन्यामध्ये एका पाण्याच्या डबक्यात पुरुषाचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला होता. नेहमीप्रमाणे पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला; परंतु लगेच दुसऱ्या आठवड्यात त्याच ठिकाणाहून पाचशे मीटर अंतरावर एका स्त्रीचाही विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला. एकापोठोपाठ दोन मृतदेह आढल्याने वेगाने तपास सुरू झाला. काही दिवस उलटताच पुन्हा याच ठिकाणी आणखी तीन मृतदेह आढळले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. केवळ दोन महिन्यांत पाच बेवारस मृतदेह आढळून आल्याने पोलिस दलही हादरून गेले आहे.
या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरत आहे. तपास सुरू आहे की नाही, हे ही कोणाला समजेनासे झाले आहे. बेवारस व्यक्तींचा तपास लागलाच पाहिजे, असा आग्रह धरणारे कोणी नसल्याने पोलिसांकडूनही चालढकल होण्याची दाट शक्यता असते. बेवारस व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध लागला नाही तर पोलिस ‘फाईल’बंद करतात; परंतु केवळ दोन महिन्यांच्या फरकाने या ठिकाणी पाच मृतदेह सापडल्याने शंका-कुशंकांना वाव मिळालाय. या ठिकाणी बोहरून कोणी मृतदेह आणून टाकत तर नसेल ना, अशी शंकाही आता पोलिसांना येऊ लागली आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
शवविच्छेदन अहवाल गुलदस्त्यात !
विवस्त्रावस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या महिलेवर अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. म्हणे, प्राथमिक अहवालही अद्याप पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितला नाही. यावरूनच या प्रकरणामध्ये नक्कीच काळेबेरे असण्याची शक्यता आहे. विनाकारण कटकट वाढेल, या हेतूने पोलिस या गंभीर प्रकरणावर पडदा तर टाकत नाहीत ना, अशी शंकाही आता निर्माण होत आहे.
मृतदेह आणून टाकल्याची शक्यता !
वाढे फाटालगत महामार्ग असल्याने या ठिकाणी बाहेरहून मृतदेह आणून टाकल्याची शक्यताही नाकारता येत नाही. पोलिसांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात बेवारस मृतदेहांची माहिती घेतली. मात्र, एकाही बेवारस व्यक्तीची ओळख पटली नाही. त्यामुळे हे सापडलेले मृतदेह कदाचित परजिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे.

Web Title: Grasshopper area becomes 'zombie of dead body'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.