पारिचारिकांचे उपकार विसरता येणार नाही : पिसाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:37 AM2021-05-14T04:37:54+5:302021-05-14T04:37:54+5:30
भुईंज येथे जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिका व आरोग्य विभागाचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद ...
भुईंज येथे जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिका व आरोग्य विभागाचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. जयभवानी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा व भुईंज ग्रामपंचायत सदस्या शैला पिसाळ यांनी मिठाई सोबतच शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.
पिसाळ म्हणाल्या, ‘वाई तालुक्यातील पूर्व भागामधील महत्त्वपूर्ण असलेले व महामार्गावरील सदैव आपत्कालीन सेवा देणारे भुईंजचे हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे आरोग्य केंद्र या परिसराची लाईफलाईन आहे. कोरोनाच्या संकटात या आरोग्य केंद्राच्या सर्वच घटकांनी टीम वर्क म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमी पडेल. त्यांनी केलेली सेवा ही कर्तव्य नसून मानवसेवा आहे.’
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला इंगळे, डॉ. महादेव वाघमोडे, आरोग्य सहायक जयश्री भोसले, कल्पना मुळीक, आरोग्य सेविका वर्षा शिंदे, रेश्मा ननावरे, वर्षा ससाणे, आरोग्य सेवक महंमद इनामदार, सचिन सोनवणे, दिलीप कादिरे, सचिन राठोड, राजेंद्र कुंभार, लेखनिक अनिल धायगुडे, रमेश देशमुख, वसंतराव पिसाळ उपस्थित होते.
===Photopath===
130521\img-20210513-wa0010.jpg
===Caption===
परिचारिकांचा सन्मान करताना भुईंज ग्रामपंचायत सदस्या शैला पिसाळ