देशाच्या संरक्षणात महाराष्टाचे मोठे योगदान, कराड येथील विजय दिवस समारोपात शरद पवारांचे गौरवोद्गार

By प्रमोद सुकरे | Published: December 16, 2022 05:00 PM2022-12-16T17:00:36+5:302022-12-16T17:01:11+5:30

सातारा जिल्हा देशाच्या इतिहासाचा महत्वाचा भाग

Great contribution of Maharashtra in the defense of the country, Sharad Pawar eulogy at the end of Victory Day at Karad | देशाच्या संरक्षणात महाराष्टाचे मोठे योगदान, कराड येथील विजय दिवस समारोपात शरद पवारांचे गौरवोद्गार

देशाच्या संरक्षणात महाराष्टाचे मोठे योगदान, कराड येथील विजय दिवस समारोपात शरद पवारांचे गौरवोद्गार

googlenewsNext

कऱ्हाड : बांगला मुक्ती लढ्यासह अनेक युद्धामध्ये देशातील जवानांनी कष्ट घेतले. त्याग केला. शौर्य दाखवलं. त्यामध्ये महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. 

कराड येथे शिवाजी स्टेडियमवर विजय दिवसाच्या मुख्य सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. यावेळी कर्नल संभाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, सातारा जिल्हा देशाच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे.  स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरोधात संघर्ष करण्यासाठी यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, देशभक्त किसन वीर या सातारा जिल्ह्यातील सुपूत्रांनी मोठा त्याग केला आहे.

Web Title: Great contribution of Maharashtra in the defense of the country, Sharad Pawar eulogy at the end of Victory Day at Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.