वाठार किरोली येथे आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:17+5:302021-04-16T04:39:17+5:30

रहिमतपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाठार किरोली ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. या वेळी ...

Greetings to Ambedkar at Wathar Kiroli | वाठार किरोली येथे आंबेडकर यांना अभिवादन

वाठार किरोली येथे आंबेडकर यांना अभिवादन

Next

रहिमतपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाठार किरोली ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

या वेळी सरपंच सुनील कांबळे यांनी जगाच्या पातळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे नाव आहे जे सर्वांना परिचित आहे. आणि ज्या नावाने प्रत्येकावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रभाव केला आहे. परंतु आता हे फक्त नाव नसून तो एक विचार, एक चळवळ आहे, ज्याने वर्षानुवर्षे जातीय व्यवस्थेला बळी पडलेल्या भारतातील लाखो शोषित, पीडित, मागासवर्गाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार बहाल केला. आता ही चळवळ पुढे नेत असताना बहुसंख्य लोकांचा प्रामाणिक उद्देश हा सामाजिक परिवर्तनाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी उपसरपंच शंकर गायकवाड, सदस्य ज्ञानदेव गायकवाड, शिवाजी माळी, धर्मेंद्र गायकवाड, सुनंदा गायकवाड, उषा गायकवाड, अनिता पिसे, मालन पवार, मनीषा गुजले, सीताराम गायकवाड, नारायण पवार, चंद्रकांत गायकवाड, अनिल कांबळे, भीमराव न्यायनीते, विजय राक्षे, प्रभाकर गायकवाड, प्रकाश गायकवाड, नामदेव वीरकर, केतन गायकवाड, अनिकेत गायकवाड, विठ्ठल जाधव, ग्रामसेवक जितेंद्र निकम, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : वाठार किरोली, ता. कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Greetings to Ambedkar at Wathar Kiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.