अण्णा बाळा पाटील यांना तांबवेत अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:29+5:302021-07-19T04:24:29+5:30
तांबवे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व येथील पहिले सरपंच दिवंगत अण्णा बाळा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ...
तांबवे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व येथील पहिले सरपंच दिवंगत अण्णा बाळा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, सरपंच शोभा शिंदे, उपसरपंच विजयसिंह पाटील, माजी मुख्याध्यापक पी.एम. पवार, संभाजीराव पाटील, सुरेश पाटील, ग्रामविकास अधिकारी टी.एल. चव्हाण, संदीप पाटील, गमेवाडीच्या सरपंच सविता ढवळे, उपसरपंच वसंतराव जाधव, आरेवाडीच्या सरपंच यादव, उपसरपंच अविनाश देसाई, विठोबा पाटील, धनंजय तायडे आदी उपस्थित होते.
घंटागाडी कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
कऱ्हाड : घनकचरा प्रकल्पाच्या नवीन ठेकेदाराने घंटागाडीवरील कंत्राटी २२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे शहरात घंटागाडी सेवा विस्कळीत झाली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. घंटागाडी सेवा सुरळीत सुरू होईल, यासाठी त्यांनी ठेकेदाराशी बोलून त्यावर तोडगा काढू, असा विश्वास घंटागाडी कर्मचाऱ्यांना दिला आहे. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक गजेंद्र कांबळे, घंटागाडीचे ठेकेदार उपस्थित होते.
बाबरमाची येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ
कऱ्हाड : बाबरमाची, ता.कऱ्हाड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच सुनीता कदम, अमोल पाटील, अधिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पोळ, शंकर कदम, पोलीस पाटील सुरेश पाटील, ग्रामसेवक उमेश पानसरे, आनंद घोरपडे, आरोग्य विभागाचे साळुंखे, बिपिन मोहिते यांच्यासह आशासेविका, अंगणवाडीसेविका आणि आरोग्यसेविका उपस्थित होत्या.
दौलतनगर परिसरात महिलांना धान्य वाटप
पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर, ता.पाटण परिसरात गव्हाणवाडी, चोपदारवाडी, मरळी या गावातील गरजू महिलांना धान्याचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालंदर पाटील, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, संचालक बबनराव भिसे, विजय राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.