सायकल रॅलीतून शहिदांना अभिवादन

By admin | Published: December 19, 2014 09:17 PM2014-12-19T21:17:08+5:302014-12-19T23:34:14+5:30

वाई फेस्टिव्हल : जागतिक सायकलस्वारासह शेकडो तरुणाईचा सहभाग

Greetings from the cycle rally to the martyrs | सायकल रॅलीतून शहिदांना अभिवादन

सायकल रॅलीतून शहिदांना अभिवादन

Next

वाई : येथे वाई फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल रॅलीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात, छान थंडी होती. त्या थंडीची पर्वा न करता मोठ्या संख्येने मुले-मुली सायकलरॅलीत सहभागी झाली. ‘भारत माता की जय’ या घोषणेने आसमंत भारावून गेला. सायकलरॅलीद्वारे शहिदांना अभिवादन करण्यात आले.
देशभक्तिपर गाणी सायकलरॅलीची शोभा वाढवून, वातावरण देशप्रेमाने रोमांचित करत होती. सायकलरॅलीच्या अग्रभागी उघड्या जीपमध्ये भारतमाता होती. भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची पर्वा न करणारा जवान, हे दृश्य खरोखरीच ह्दयाला साद घालणारे होते. गणपती घाटावरून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण वाई शहरातून प्रदक्षिणा घालून गणपती घाटावर समारोप करण्यात आला.सायकलरॅलीचे उद्घाटन रोटरी अध्यक्षा सोनाली शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. फेस्टिव्हलचे निमंत्रक आनंद कोल्हापुरे, सचिव डॉ. नितीन कदम व प्रमोद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. वाई रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दादा लोळे व मदनकुमार सावळेकर यांनीही सायकलरॅली पूर्ण केली.
जागतिक सायकलवीर वाईचा विक्रमवीर प्रसाद एरंड तसेच राष्ट्रीय कराटे खेळाडू वैष्णवी पिसाळ यांच्यासह विद्यार्थ्यांचा या रॅलीत सहभाग होता. रोटेरीयन मदन पोरे, राजेंद्र धुमाळ, डॉ. नीलिमा भोसले, डॉ. जयश्री जगताप, नगरसेविका अनुराधा कोल्हापुरे, विजय पोरे, परामर अभ्यंकर, सचिन येवले, बाबू देशमुख, राजे गुरव, संतोश चव्हाण, सुनील शिंदे, प्रशांत सोनावणे, योगेश दाहोत्रे, मिलिंंद अष्टपुत्रे, गणेश लाड, चेतन गोरे, महादेव भगत, विशाल गुजर, संगीता सोनावणे आदी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

आज ‘देश मेरा रंगिला’
वाई फेस्टिव्हलचे उद्घाटन शनिवार, दि. २० सायंकाळी साडेसहाला महागणपती घाटावर होणार आहे. यावेळी ‘देश मेरा रंगीला’ हा नृत्य संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Web Title: Greetings from the cycle rally to the martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.