ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना नायगावमध्ये अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:02 AM2021-01-04T11:02:53+5:302021-01-04T11:06:36+5:30

Savitri Bai Phule Satara- नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. क्रांतिज्योतींचा समता व समानतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो. त्यांचा जन्मदिन संपूर्ण देशात सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नायगाव येथे रविवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते.

Greetings to Dnyanjyoti Savitribai Phule in Naigaon | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना नायगावमध्ये अभिवादन

नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकास रविवारी मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिवादन केले. (छाया : दशरथ ननावरे)

googlenewsNext
ठळक मुद्देज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना नायगावमध्ये अभिवादनमहिला शिक्षण दिन देशभर साजरा व्हावा  : छगन  भुजबळ

खंडाळा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. महिलांसाठी शिक्षणाचे खरे काम फुले दाम्पत्याने केले. त्याचा गौरव ब्रिटिश सरकारनेही केला.

नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. क्रांतिज्योतींचा समता व समानतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो. त्यांचा जन्मदिन संपूर्ण देशात सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

नायगाव येथे रविवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, बापुसाहेब भुजबळ, सभापती राजेंद्र तांबे, मंजिरी धाडगे, जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी अनंत यातना सहन करून महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य झिजवले. त्यांनी पराकोटीचा त्याग केला म्हणून महिलांचा उध्दार होऊ शकला. त्यांच्या कार्याचे व शिक्षणाचे हे महत्व पुढच्या पिढीला कळावे, यासाठी त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मुली शाळेबाहेर राहणार नाहीत, यासाठी सरकार काम करेल. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे यांनी स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनुयायांनी दिवसभर गर्दी केली होती. सकाळी ग्रामस्थांनी साध्या पध्दतीने प्रतिमेची मिरवणूक काढली होती. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.








अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

Web Title: Greetings to Dnyanjyoti Savitribai Phule in Naigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.