संभाजी महाराज बलिदान दिनी खासदार उदयनराजे यांनी केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:20 AM2021-04-12T10:20:28+5:302021-04-12T10:22:01+5:30

Udayanraje Bhosale satara-छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पहाटे समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. बलिदान स्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो शंभूभक्त समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी राज्याच्या विविध भागातून शंभूज्योत आणत असतात. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथीचे कार्यक्रम स्थानिक पातळीवर करण्यात आले.

Greetings by MP Udayan Raje on Sambhaji Maharaj Sacrifice Day | संभाजी महाराज बलिदान दिनी खासदार उदयनराजे यांनी केले अभिवादन

संभाजी महाराज बलिदान दिनी खासदार उदयनराजे यांनी केले अभिवादन

Next
ठळक मुद्देसंभाजी महाराज बलिदान दिनखासदार उदयनराजे यांनी केले अभिवादन

सातारा :  छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पहाटे समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. बलिदान स्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो शंभूभक्त समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी राज्याच्या विविध भागातून शंभूज्योत आणत असतात. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथीचे कार्यक्रम स्थानिक पातळीवर करण्यात आले.

आज पहाटे छत्रपती संभाजी महारांजाच्या समाधी स्थळावर नित्यनियमाने होणारी पूजा ग्रामस्थांनी केली. महाराजांच्या समाधीवर जलाभिषेक करुन अभिवादनाला सुरूवात झाली. त्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. प्रथेप्रमाणे उपस्थित ग्रामस्थांनी महाराजांची प्रार्थना करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी कवी कलश यांच्या समाधीवर फुले वाहून दर्शन घेवून महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते समाधीपरिसरात रक्तचंदन आणि अजानवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ सचिन पुणेकर यांनी या वृक्षाचे महत्व सांगितले. त्याचबरोबर या वृक्षारोपणासाठी विविध नद्यांतून पाणी आणल्याचे मिलिंदभाऊ गायकवाड यांनी सांगितले. अभिवादनासाठी वढु बुद्रुकचे सर्व ग्रामस्थ, शंभूभक्त उपस्थित होते.

Web Title: Greetings by MP Udayan Raje on Sambhaji Maharaj Sacrifice Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.