सदाशिवगडावर राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:15+5:302021-01-16T04:42:15+5:30

कऱ्हाड : किल्ले सदाशिवगड, ता. कऱ्हाड येथे दुर्गप्रेमी नागरिकांनी तर सुपने, अभयचीवाडी, मुंढे, पाडळी, वनवासमाची गावच्या हद्दीवर जानाईदेवीच्या मंदिरात ...

Greetings to Rajmata Jijau at Sadashivgad | सदाशिवगडावर राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

सदाशिवगडावर राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

Next

कऱ्हाड : किल्ले सदाशिवगड, ता. कऱ्हाड येथे दुर्गप्रेमी नागरिकांनी तर सुपने, अभयचीवाडी, मुंढे, पाडळी, वनवासमाची गावच्या हद्दीवर जानाईदेवीच्या मंदिरात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यापासून प्रत्येकाने आदर्श घ्यावा, असे मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सुपनेचे प्रकाश पाटील, अशोक सुर्वे, अंकुश काटकर, डॉ. रमेश पाटील, भगवान पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रारंभी ज्येष्ठ महिला कल्पना सुर्वे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

मधुअण्णा कुलकर्णी यांना श्रद्धांजली

कऱ्हाड : येथे दिवंगत मधुअण्णा कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक कार्यात संगमसमूहाने नेहमीच योगदान दिले आहे. दिवंगत मधुअण्णा कुलकर्णी यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्याचा भक्कम पाया निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सारंग पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, आनंदराव पाटील, शिक्षण मंडळाचे सचिव शेखर देशपांडे, डॉ. संजय पवार, डॉ. सतीश शिंदे यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत मधुअण्णा कुलकर्णी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

विरवडेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील विरवडे ग्रामपंचायतीची निवडणूक सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. त्याबद्दल नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. दीपक जाधव, प्रफुल्ल वीर, सागर हाके, शैलेश कोल्हटकर, रत्नमाला धोकटे, जयश्री शिंदे, सुमन धोकटे, बेबीताई कुंभार, अर्चना मदने, वैशाली गोतपागर व तमन्ना मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नूतन मराठी शाळेत आसगावकरांची भेट

कऱ्हाड : आगाशिवनगर-मलकापूर येथील लक्ष्मीदेवी शिक्षण मंडळ संचालित नूतन मराठी प्राथमिक शाळेत आमदार जयंत आसगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे सचिव व मलकापूर पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार आसगावकर यांनी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक भास्करराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी संस्थेचे संचालक वसंतराव शिंदे, आनंदराव सुतार, मोहनराव शिंगाडे, महेंद्र भोसले, मुख्याध्यापक आनंदा पाटील यांच्यासह शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

‘विठामाता’मध्ये विद्यार्थिनींची हरित शपथ

कऱ्हाड : येथील विठामाता विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत हरित शपथ घेतली. ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर मोठ्या उत्साहात आयोजित केले जात आहे. सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शाळा व महाविद्यालयांचा त्यामध्ये सहभाग आहे. त्यानुसार, क-हाडच्या विठामाता विद्यालयात विद्यार्थिनींना हरित शपथ देण्यात आली. उपशिक्षिका थोरात यांनी अभियानाची विद्यार्थिनींना माहिती दिली. उपमुख्याध्यापक कदम यांनी हरित शपथेचे वाचन केले.

वाल्मीक विद्यामंदिरात विविध कार्यक्रम

तळमावले : येथील वाल्मीक विद्यामंदिरामध्ये मुख्याध्यापक श्रीनिवास वाळवेकर व ज्येष्ठ शिक्षक पी.एस. काशीद यांच्या मार्गदर्शनानुसार स्वामी विवेकानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्राचार्य अरुण गाडे यांचे व्याख्यान झाले. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या हस्ते झाले. सप्ताहाचा समारोप मंगळवार, दि. १९ केंद्रप्रमुख उत्तमराव घाडगे यांच्या उपस्थितीत काव्यवाचन स्पर्धेने होणार आहे. सप्ताहात वक्तृत्व, निबंध, कथाकथन, चित्रकला, रांगोळी अशा विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पारितोषिक दिले जाणार आहे. प्रथम तीन स्पर्धकांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे.

Web Title: Greetings to Rajmata Jijau at Sadashivgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.