यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:54 PM2019-11-25T23:54:39+5:302019-11-25T23:55:38+5:30
कºहाड : ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी सोमवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळी ...
कºहाड : ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी सोमवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.
खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार मोहनराव कदम, सारंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, कºहाड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, उपाध्यक्ष दुर्गेश मोहिते, शहराध्यक्ष अप्पा माने, प्रकाश शिवडेकर, सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, अॅड. आनंदराव पाटील-उंडाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, राष्ट्रवादी उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, विजय वाटेगावकर, प्रमोद पाटील, मीना बोरगावे, पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, प्रशांत यादव, मनोहर शिंदे, गंगाधर जाधव, इंद्रजित चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळ रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित केले होते. स्मृतिस्थळावर महिलांनी भजन सादर केले. यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी भूपाल कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आडके यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील उपस्थित होते.
यशवंत समता
ज्योतीचे स्वागत
कºहाड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी यशवंत समता ज्योत आणण्यात आली. यावेळी या ज्योतीचे खासदार शरद पवार यांनी स्वागत केले.
...तरीही पवार कºहाडात !
राज्यात सध्या सत्तास्थापनेचा गुंता वाढत चालला आहे. त्यामुळे बरीचशी राजकीय मंडळी मुंबईतच अडकली आहेत. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कºहाडला दौरा केला. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. याची कार्यकर्त्यांच्यात चर्चा होती.