मोती चौकात तडफडणाऱ्या गाढवाला सलाईन लावून जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:58 PM2018-06-19T23:58:02+5:302018-06-19T23:58:02+5:30

साताऱ्यातील मोती चौकातच एक गाढव फूटपाथजवळ लोळत व विव्हळत पडले होते. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच परिस्थितीत पडले होते.

 A grenade stuck in the Moti Chowk with a line! | मोती चौकात तडफडणाऱ्या गाढवाला सलाईन लावून जीवदान!

मोती चौकात तडफडणाऱ्या गाढवाला सलाईन लावून जीवदान!

Next

सातारा : साताऱ्यातील मोती चौकातच एक गाढव फूटपाथजवळ लोळत व विव्हळत पडले होते. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच परिस्थितीत पडले होते.

काही वेळाने त्याला जागेवरून काहीच हलचाल करता येत नसल्याचे पाहून नागरिकांनी एका सामाजिक संघटनेला बोलावून त्याच्यावर तातडीने उपचार केले. त्यामुळे गाढवाला जीवदान मिळाले. प्लास्टिक खाल्ल्यामुळे या गाढवाचे पोट फुगले होते.

याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील मोती चौकात मंगळवारी सकाळी आकरा वाजल्यापासून एक गाढव विव्हळत पडले होते. याकडे सुरूवातीला फारसे कोणीच लक्ष दिले नाही. परंतु दुपारपर्यंत विव्हळने बंद झाले नसल्याने गाढवाला काही तरी गंभीर आजार झाला असल्याचा अंदाज काही नागरिकांनी लावला. त्यानंतर तेथील काही नागरिकांनी गाढवाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाढव पाणी पिले नाही.या दरम्यानच या गाढवाचे सतत पोट फुगत होते. त्यामुळे गाढव फक्त लोळतच होते. म्हणून काही नागरिकांनी प्राण्यांसाठी औषध उपचार करणाºया एका सामाजिक संस्थेला याची कल्पना दिली. त्यानंतर गाढवावर उपचार करण्यात आले.
उपचार करणाºया कार्यकत्यांनी सांगितले की, गाढवाने चरताना प्लास्टिक खाल्ले असावे. त्यामुळे पोट फुगले असून, त्याच्या पोटात ते अडकून बसले असण्याची शक्यता आहे. अशा आजाराला कोलिक आजार असे म्हणतात. त्यामुळे त्याला पोटात असह्य वेदना होत होत्या. या वेदना कमी झाल्या नाही तर शक्यतो एक दिवसाच्या आत गाढव दगावू शकते. हे गाढव दोन वर्षांचे असून, त्याला चार सलाईन लावण्यात आल्याने त्याच्या वेदना कमी
झाल्या आहेत. काही तासांत ते बरे होईल. काही नागरिकांच्या जागृकतेमुळे गाढवाला जीवदान मिळाले.

बाजूला घेण्यासाठी कोणी आले नाही...
गाढव दिसले की दोन हात लांबच राहणे नागरिक पसंत करतात. मंगळवारी विव्हळत पडलेल्या गाढवाला पाहून अनेकांनी लांबूनच जाणे पसंत केले. तर काही प्राणी मित्रांनी त्याला लांबूनच पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात गाढवाचे उपचार करण्यासाठी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आले तेव्हा रस्त्यावर पडलेल्या गाढवाला बाजूला घेण्यासाठी कोणीच जवळ आले नाही. त्यामुळे भररस्त्यावरच गाढवाला सलाईन लावून उपचार करण्यात आले.

 

मी काम करत असलेल्या दुकानासमोर गाढव तडफडत पडले होते. त्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. मरणाच्या स्थितीतील अवस्था गाढवाची झाल्याने आम्ही त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याच्या वेदना न थांबल्याने प्राणी मित्राला बोलावण्यासाठी नागरिकांना सांगितले.
- बाळासाहेब कदम, सुरक्षारक्षक

Web Title:  A grenade stuck in the Moti Chowk with a line!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.