मळाईदेवी पतसंस्थेला एक कोटी बारा लाखाचा ढोबळ नफा : थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:20+5:302021-02-16T04:39:20+5:30
मलकापूर येथे आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या ...
मलकापूर येथे आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अरुणादेवी पाटील यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेचे नोटीस वाचन सचिव सर्जेराव शिंदे व अनिल पवार यांनी केले. यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. अध्यक्षा अरुणादेवी पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. संस्था स्थापन करताना केवळ सामाजिक उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार वाटचाल करीत गरीब, शेतकरी, शेतमजूर, लघु उद्योजक व व्यावसायिकांना अर्थसाहाय्य करून बाजारात त्यांची पत निर्माण केली. सर्व शाखांमधून लॉकर सुविधा व सोने तारण सुविधा निर्माण केली. आजअखेर संस्थेच्या मुख्य कार्यालयासह १५ शाखा, असा विस्तार केला. संस्थेचे ६ हजारावर सभासद असून संस्थेच्या ३१ मार्च २०२० अखेर ११७ कोटींच्या ठेवी आहेत. तसेच संस्थेने गरजू लोकांना ७७ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे भागभांडवल ७.७७ कोटी इतके आहे. संस्थेने तरलतेपोटी ५१.६२ लाख इतर बँकांमध्ये आपली गुंतवणूक केलेली आहे. संस्था स्थापन झाल्यापासून सतत अ वर्ग संपादन केलेला आहे.
पांडुरंग पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. (वा. प्र.)
फोटो : १५केआरडी०१
कॅप्शन :
मलकापूर येथे श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या सभेत अशोकराव थोरात यांचे भाषण झाले.