पावसाच्या उघडीपीने भुईमूग काढणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:23+5:302021-06-11T04:26:23+5:30
आदर्की : फलटण पश्चिम भागात मान्सून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाळी भुईमूग काढणीला वेग आल्याचे चित्र आदर्की-बिबी परिसरात दिसत ...
आदर्की : फलटण पश्चिम भागात मान्सून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाळी भुईमूग काढणीला वेग आल्याचे चित्र आदर्की-बिबी परिसरात दिसत आहे.
फलटण पश्चिम भागात बिबी, सासवड,आदर्की परिसरात उन्हाळी भुईमूग पाण्याच्या उपलब्धेप्रमाणे घेतले जात होते. परंतु धोम-बलकवडीचे पाणी या परिसरात आल्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे ऊस, मका, कडवळ त्याप्रमाणे पालेभाज्या लागवडही वाढली; परंतु स्वंयपाक घरात रोज लागणारे शेंगदाणा व तेल यामुळे प्रत्येक शेतकरी भुईमूग पिकाकडे वळाला आहे. यावर्षी पर्जन्यमान व धोमबलकडीचे आवर्तन वेळेत सुटल्याने भुईमूग पिकाची समाधानकारक वाढ झाली; पण शेगांचे प्रमाण समाधानक दिसत नाही.
मजूर वर्ग रोजंदारीवर भुईमूग काढणी करत नाहीत, भुईमूग ढाळे उपटणे व शेंगा तोडणे असे दिवसभर दहा किलो शेंगा तोडल्यास शेतकऱ्यास नऊ किलो व मजुरास एक किलो, असे प्रमाण राहते. यावर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भुईमूग काढणी उशिरा सुरू झाल्याने भुईमुगाच्या शेंगा काही प्रमाणात उगविल्याचे चित्र दिसत आहे. बिबी, घाडगेवाडी, कापशी, आळजापूर, सासवड, आदर्की, हिंगणगाव परिसरात या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने भुईमूग काढणीची लगबग आदर्की-बिबी पारिसरात दिसत आहे.
१०आदर्की
बिबी (ता. फलटण) परिसरात भुईमूग काढणीची लगबग दिसत आहे.