भाजपच्या गोटातील ‘कॅप्टन’ पृथ्वीबाबांच्या गटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:55 PM2018-06-21T23:55:50+5:302018-06-21T23:55:50+5:30

In the group of 'Captain' earthbelt of BJP group | भाजपच्या गोटातील ‘कॅप्टन’ पृथ्वीबाबांच्या गटात

भाजपच्या गोटातील ‘कॅप्टन’ पृथ्वीबाबांच्या गटात

Next

प्रमोद सुकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : गत पालिका निवडणुकीत इंद्रजित गुजर (कॅप्टन) अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते पाठिंबा दिलेल्या आमदार बाळासाहेब पाटील पुरस्कृत लोकशाही आघाडीबरोबर पालिका सभागृहात काम करतील, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात त्यांनी भाजपच्या गोटात जाणे पसंत केले. गत महिन्यात फारूख पटवेकर यांची स्वीकृत नगरसेवक होईपर्यंत ते भाजपच्याच गोटात दिसत होते. गत आठ दिवसांत त्यांनी दोन ते तीन कार्यक्रमांना पृथ्वीबाबांबरोबर हजेरी लावण्याने ते काँगे्रसच्या चव्हाण गटात सहभागी झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत शहर व तालुक्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
गुजर परिवार हा मूळचा कºहाड तालुक्यातील रेठरे गावचा! पण अनेक वर्षांपासून कºहाडात स्थायिक झालाय. कºहाडच्या सार्वजनिक व वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं नेहमीच योगदान राहिलंय. तर विद्यानगरी कºहाडमध्ये त्यांनी दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रुपाने भरच घातली आहे. अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर गत पालिका निवडणुकीत त्यांना राजकीय क्षेत्रातही नागरिकांनी काम करण्याची संधी दिली आहे.
पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा अपक्ष म्हणून रिंगणात उतरून पराभव केला. त्यात राष्ट्रवादी पुरस्कृत लोकशाही आघाडीने येथे स्वतंत्र उमेदवार उभा न करता इंद्रजित गुजर यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला. त्यातच निकालानंतर राजेंद्र यादव समर्थकांनी स्वकीयांनीच दगा फटका केल्याने पराभव झाल्याची टीका केली. अन् त्यानंतर पालिकेच्या राजकारणात काय ‘रामायण’ घडले, हे साऱ्यांनाच माहीत आहे.
राजेंद्र यादव यांचा पराभव करून ‘मेहरबान’ झालेले इंद्रजित गुजर जनशक्ती आघाडीबरोबर जाणे कठीण होते. मात्र अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिलेल्या लोकशाही आघाडीबरोबर गुजर सभागृहात बसतील, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात भाजपबरोबर जाणे त्यांनी पसंत केले. भाजपचे सभागृहात चारच नगरसेवक होते. मात्र, इंद्रजित गुजर व मिनाज पटवेकर या दोन अपक्षांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच भाजपला पालिकेत स्थायी समितीवर काम करण्याची संधी मिळाली. तर एका स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी लागली.
अलीकडच्या काही महिन्यांत पालिकेच्या राजकारणात भाजप अन् जनशक्ती आघाडी यांचे ‘ट्यूनिंग’ चांगलेच जमल्याचे अनेकदा दिसून आले आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या झालेल्या आढावा बैठकीला जनशक्ती, भाजपा अन् अपक्ष मिनाज पटवेकर हेही होते. मात्र, गुजर यांनी दांडी मारली होती. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानंतर ‘जनशक्ती’च्या नगरसेवकांनी त्यांचे कºहाड शहरात प्रवेशद्वारावर जंगी स्वागत केले होते. यावेळी जयवंत पाटील, राजेंद्र यादव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गुजर व यादव यांच्यातील विळा भोपळ्याचे सख्य आख्ख्या शहराला माहीत आहे. यादवांची भाजपशी वाढणारी सलगी गुजरांना पटणारी अन् परवडणारी नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी काँगे्रसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी स्नेह वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.

Web Title: In the group of 'Captain' earthbelt of BJP group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.