कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:03+5:302021-05-27T04:41:03+5:30

कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच ...

Growing support for the Koyna project victims movement | कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

Next

कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे. यामध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, ठाणे व पालघर जिल्ह्यांत विभागलेले साडेपाचशे मूळ खातेदार व सव्वीस हजार प्रकल्पग्रस्त यामध्ये सहभागी झाले आहेत. सोमवार, दि. २४ पासून आठव्या दिवशी त्यांनी एक वेळचे सकाळचे जेवण बंद करून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.

कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावेत म्हणून श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने इतर जिल्ह्यांत असलेल्या चळवळीच्या वतीने एक दिवसाचे धरणे धरून पाठिंबा देण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील उरमोडी, तारळी, वांग, धोम व कण्हेर या धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त, कऱ्हाड विमानतळ, कासारशिरंबे येथील ग्रामस्थ, सांगली जिल्ह्यातील वांग, वारणा व चांदोली अभयारण्यग्रस्त व दुष्काळी भागातील समान पाणी चळवळीतील गावे, कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा व चांदोली अभयारण्यग्रस्त आणि आजरा तालुक्यातील उचंगी, सर्फनाला व चित्री येथील धरणग्रस्त, सोलापूर जिल्ह्यातील कण्हेर, धोम व उजनी येथील धरणग्रस्त. रत्नागिरी जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यग्रस्त, गडनदी धरणग्रस्त, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नऊ गावे खारेपाटमधील शेतकरी, पुणे जिल्ह्यातील वीर बाजी पासलकर व पाणशेत धरणग्रस्त व औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी व टेंभापुरी धरणग्रस्त, दिघा घर बचाव समिती नवी मुंबई आदी सहभागी झाले आहेत.

कोट..

शासनाने कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यावर या धरणग्रस्तांच्या पाठिंब्यासाठी महाराष्ट्रातील इतर समाजघटक व जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल. त्यांना आवरणे सरकारला कठीण जाईल.

- संपत देसाई, कार्याध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल

कोट..

गेली ६४ वर्षे हे प्रकल्पग्रस्त शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी लढा देत आहेत. हे जर सरकारला समजत नसेल तर काही वेगळे वळण लागले तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. मग मात्र दोष यावेळी देऊ नये.

ॲड कृष्णा पाटील, श्रमिक मुक्ती दल, सांगली जिल्हाध्यक्ष

Web Title: Growing support for the Koyna project victims movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.