निवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर! : अर्धनग्न मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 07:32 PM2019-01-23T19:32:12+5:302019-01-23T19:33:40+5:30

खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले.

 Guardian Minister's hands on the statement! : Ardhangna Morcha | निवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर! : अर्धनग्न मोर्चा

निवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर! : अर्धनग्न मोर्चा

Next

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले. शेतकºयांनी पालकमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल केली. पालकमंत्री शिवतारे यांच्या मंत्रालयातील दालनात शेतकºयांनी दिलेल्या निवेदनाची प्रतच सही शिक्क्यानिशी सोशल मीडियावर वायरल केली आहे.

एमआयडीसी टप्पा क्र.१, २, ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी गेल्या दहा वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तहसीलदार कार्यालय ते मुंबई मंत्रालयांवर अर्धनग्न मोर्चा काढला होता. मोर्चा मुंबई येथील मानखुर्द याठिकाणी पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार भर उन्हात अडविला. मुंबई याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त करत शेतकºयांना पुढे जाण्यापासून अडवत अकरा तासांनंतर आंदोलकांच्या सुरक्षिततेचे कारण सांगत ताब्यात घेत चेंबूर येथील एका विद्यालयामध्ये आंदोलकांना ठेवण्यात आले होते.

त्यावेळी आंदोलकांमधून एका शेतकºयाने जिल्'ाचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी बांधवांना मदत करण्याची याचना केली. पालकमंत्र्यांनी शेतकºयांना फैलावर घेत याबाबतचे निवेदन मेलद्वारे मिळाले नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे शेतकºयांनी या घटनेचा तेथेच निषेध व्यक्त केला होता.

शासनाच्या धोरणाचे वस्त्रहरण झाल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकºयांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला. त्यानंतर शेतकºयांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या दाव्याची पोलखोल करत मुंबई येथील मंत्रालयात असणाºया पालकमंत्र्यांच्या दालनात खासगी सचिवांच्या सही शिक्क्यानिशी दिलेल्या निवेदनाची प्रतच शेतकºयांनी सोशल मीडियावर टाकत पालकमंत्र्यांच्या दाव्याची चिंधड्या उडवल्या आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दावा फोल ठरल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे.

खंडाळा तालुक्याशी देणे-घेणे नाही
खंडाळा तालुक्यातील शेतकरी समस्या पोटतिडकीने मांडत असताना पालकमंत्री म्हणून संविधानिक जवाबदारी पार पाडणाºया विजय शिवतारे यांना शेतकºयांच्या समस्यांचे देणे-घेणे नाही. केवळ सातारा जिल्'ात पर्यटनासाठी येणाºया पालकमंत्र्यांना खंडाळा तालुक्याशी देणे-घेणे नाही. त्यांना शेतकºयांची व्यथा काय कळणार आहे, हा प्रश्न आहे शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

 

Web Title:  Guardian Minister's hands on the statement! : Ardhangna Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.