.. गडीमान्सांनी बी दारं लावून घेतली!

By admin | Published: March 28, 2016 11:39 PM2016-03-28T23:39:12+5:302016-03-29T00:15:08+5:30

विनयभंगावेळची ‘तिची’ व्यथा : भररस्त्यात ‘तो’ करीत होता पाठलाग

Guards have bracted! | .. गडीमान्सांनी बी दारं लावून घेतली!

.. गडीमान्सांनी बी दारं लावून घेतली!

Next

सातारा : ‘बायमान्साचं मी समजू शकते; पन गडीमान्सांनी बी दारं धडाधड लावून घेतली. शेवटी एका बाईला म्हटलं... बाईनं बाईला मदत नाही करायची तर कुनी करायची... मग तिनं लपायला जागा दिली..’विनयभंगाची रीतसर फिर्याद दाखल झाली. ‘त्या’ला अटकही झाली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. ‘ती’ मात्र हा प्रसंग आठवला तरी आसवं गाळते. खरं तर वाईट प्रवृत्तींपासून लेकीला जपण्याचे तिचे दिवस; पण या वयात तिच्यावरच गुरुवारी भीषण प्रसंग ओढवला. दहा घरचं धुणं-भांडी करून संसार चालवणाऱ्या या महिलेला त्या प्रसंगाची आठवण झाल्यावर त्रास होतोच; पण त्याहून अधिक त्रास होतो तो नागरिकांच्या तटस्थपणाचा.कामावर जाताना शुक्रवार पेठेतल्या एका मंदिरात माथा टेकून पुढं जायचं, असा या महिलेचा दिनक्रम. गुरुवारी देवासमोर हात जोडून उभी असताना मागे कुणीतरी असल्याची जाणीव तिला झाली. वळून पाहिलं तर ‘तो’ छोट्या दरवाजाला दोन्ही बाजूंना दोन हात ठेवून वाट अडवून उभा...मनाचा हिय्या करून तिने त्याच्या हाताखालून पळ काढला, तसा त्याने तिचा पाठलाग सुरू केला. भररस्त्यात ती पुढे आणि तो मागे धावत होता. ती मोठमोठ्यानं ओरडू लागली... मदतीसाठी; पण लोकांनी मदत करण्याऐवजी धडाधड दारं लावून घ्यायला सुरुवात केली. ‘धट्टीकट्टी गडीमान्सं बी घरात पळत होती,’ असं तिचं म्हणणं. अखेर एका घरात तिला एक महिला दिसली. जिवाच्या आकांतानं ती ओरडली, ‘बाईनं बाईला मदत नाही करायची तर कुनी करायची...’ महिलेनं फाटक उघडून तिला आत घेतलं आणि एका फुलझाडामागे लपवलं. या सगळ्या धावपळीनं ‘तिची’ अवस्था बिकट झालेली. धाप लागली होतीच; शिवाय रक्तदाबाचा त्रास! त्यातच धावताना ती हाती लागत नाही हे पाहून ‘त्याने’ तिला जोरात लाथ मारल्यामुळं प्रचंड वेदना होत होत्या. या महिलेनंही मदत करायला नकार दिला असता, तर मात्र ‘तिची’ धडगत नव्हती! संकटात असलेल्या महिलेला मदत मिळत नाही. हे वास्तव या घटनेमुळे समोर आले असून, त्याचेच शल्य ‘तिला’ अधिक आहे. (प्रतिनिधी)


रुग्णालयातच नोंदविला जबाब
वेदनेनं तळमळणाऱ्या ‘तिला’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इकडे कुणीतरी फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं होतं. पोलिस ‘त्याला’ घेऊन गेले होते. नंतर पोलिसांनी रुग्णालयातच तिचा जबाब नोंदवून घेतला. ‘ती’ ज्या घरात कामं करते, त्यातल्याच एका सद््गृहस्थाने तिला तक्रार नोंदवायला सांगितलं होतं. अन्यथा हा प्रकार कुणाला समजलाही नसता. ‘सायबांनी खूप मदत केली,’ असं ‘ती’ सांगते.

Web Title: Guards have bracted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.