पोळ यांच्या मेळाव्यात गुदगेंची ‘एंन्ट्री’
By admin | Published: October 1, 2014 01:09 AM2014-10-01T01:09:11+5:302014-10-01T01:10:56+5:30
मायणी : मायणी येथे शुक्रवारी काँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पोळ यांना
मायणी : मायणी येथे शुक्रवारी काँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पोळ यांना गुदगे गटाने जाहीर पाठिंबा दिला. त्यानिमित्त आयोजित गुदगे समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुरेंद्र गुदगे स्वत: सामील झाले. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, तुकाराम तुपे, वडूज बाजार समितीचे सभापती सोमनाथ माळी, प्रा. सदाशिव खाडे, सदाशिव राऊत, शाहिस्तेखान मुलाणी उपस्थित होते.
सुरेंद्र गुदगे म्हणाले ‘राजकाणात वरचढ होऊ नये म्हणून आ. गोरे यांनी माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवर आघात केले. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शोभना गुदगे यांना पक्षप्रवेश पद देताना जिल्ह्यातून सर्वांचा पाठिंबा असताना गोरे यांनीच विरोध केला. मायणी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला समर्थक कार्यकर्त्यास माझा पॅनेलविरोधात उमेदवारी टाकून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मार्केट कमिटीमध्ये देखील माझ्या विचाराच्या सभापतीवर अविश्वास ठराव आणला.
हे सर्व सहन केले; मात्र उरमोडीचे पाणी निवडणूक निधीसाठी मातीची बेईमानी करून सांगलीस विकल्याने जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना यापुढे कदापिही साथ न देण्याचा निश्चय करूनच पोळतात्यांना या निवडणुकीत माझ्या संघटनेने पाठिंबा देण्याचा निश्चय केला.’ राष्ट्रवादीकडून योग्य तो सन्मान दिला जाईल. आजच्या सभेने आपल्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहणारे कार्यकर्ते ठामपणाने सुरेंद्र गुदगेंच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. सुरेंद्र गुदगेंच्या संघटनेतून किंगमेकरचा किंग होण्याची संधी सुरेंद्र गुदगे यांना यानिमित्ताने मिळणार आहे. माणचे लोकप्रतिनिधी पाणी आणल्याचे नाटक करून निवडणूक स्टंट निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. (वार्ताहर)