कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:52+5:302021-06-02T04:28:52+5:30

फलटण : कोरोना महामारीमध्ये शेतकऱ्यांना घरी व शेताच्या बांधावर बसून तंत्रज्ञान अवगत करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘बीबीफ यंत्र जोडणी ...

Guidance to farmers through the Department of Agriculture | कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

फलटण : कोरोना महामारीमध्ये शेतकऱ्यांना घरी व शेताच्या बांधावर बसून तंत्रज्ञान अवगत करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘बीबीफ यंत्र जोडणी वापर व फायदे’ या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन गुगल मीटद्वारे करण्यात आले. या ऑनलाइन प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीबीफ पेरणी यंत्राच्या वापराबाबत माहिती दिली. पेरणी क्षेत्र वाढविणे, जल व मूलस्थानी तंत्रज्ञान अवलंब वाढविणे, पिकांच्या उत्पादन खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे, तसेच बीबीफ पेरणी यंत्राचा प्रसार व प्रचार करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणत बीबीफ पेरणी यंत्राच्या साह्याने खरीप हंगामामध्ये पेरणी करावी, असे आवाहनही त्यांनी केली.

कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी बीबीफ पेरणी यंत्राच्या पेरणी यंत्र जोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याचे, तसेच पेरणी यंत्र जोडणी कशा पद्धतीने केले पाहिजे, प्रत्येक पिकाची बियाणे पेरणी करताना कोणत्या चकत्या वापरल्या पाहिजेत याची माहिती शेतकऱ्यांना दिली.

Web Title: Guidance to farmers through the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.