तासवडे ग्रामपंचायतीत सत्तांतराचा गुलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:34 AM2021-01-21T04:34:53+5:302021-01-21T04:34:53+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तरमधील महत्त्वाच्या अशा तासवडे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व ...
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तरमधील महत्त्वाच्या अशा तासवडे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व कऱ्हाड उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित जाधव आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक माजी सरपंच राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री ग्रामविकास आघाडीने ग्रामपंचायतीत निर्विवाद वर्चस्व मिळवले.
तासवडे ही विभागातील महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. टोलनाका, एमआयडीसी यामुळे या गावच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीत सह्याद्री ग्रामविकास आघाडीचे सात तर विरोधी सह्याद्री लोकमान्य पॅनेलचे २ सदस्य निवडून आले. माजी उपसरपंच नारायण जाधव व माजी संचालक भानुदास जाधव यांच्या सह्याद्री लोकमान्य पॅनेलचा सह्याद्री ग्रामविकास आघाडीने धुव्वा उडवला.
सह्याद्री ग्रामविकास आघाडीचे दीपाली अमित जाधव, भीमराव सयाजी खरात, मनिषा दिलीप जाधव, सुभाष मारुती जाधव, लता शहाजी जाधव, भारती पांडुरंग शिंदे हे उमेदवार निवडून आले. पॅनेल निवडून येण्यासाठी माजी सरपंच विकास जाधव, सुनील जाधव, शंकर सुतार, अरविंद जाधव, युवराज जाधव, शंकर शिंदे, दामोदर खरात, मोहन खरात, रमेश जाधव, आनंदा खरात, संजय खरात, सुधीर खरात, भिकाजी जाधव, लक्ष्मण जाधव, हणमंत जाधव, नितीन खरात आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
फोटो : २०केआरडी०२
कॅप्शन : तासवडे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.