गुंड दत्तात्रय पवार जिल्ह्यातून तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:09 PM2019-03-30T12:09:18+5:302019-03-30T12:10:38+5:30
गर्दी, मारामारी, विनयभंग, घरात प्रवेश करून मारहाण करणे आदी पाच गुन्हे दाखल असलेला गुंड दत्तात्रय उत्तम पवार (वय ४२,रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) याला सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
वाठार स्टेशन : गर्दी, मारामारी, विनयभंग, घरात प्रवेश करून मारहाण करणे आदी पाच गुन्हे दाखल असलेला गुंड दत्तात्रय उत्तम पवार (वय ४२,रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) याला सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
दत्तात्रय पवार याच्याविरूद्ध असलेल्या पाच गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्याच्या वर्तनामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने हद्दपारीचा प्रस्ताव कोरेगाव येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दत्तात्रय पवार याला तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल मुलाणी यांनी त्याला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे सोडून दिले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखी काही व्यक्तींना तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर, सहायक पोलीस फौजदार जाधव यांनी ही कारवाई केली.