औंध येथील गुरव समाजाकडून शासनाला १० बेडची मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:31+5:302021-05-06T04:41:31+5:30

औंध : खटाव तालुक्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता शासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री यमाईदेवीचे गुरव-पुजाऱ्यांनी १० बेड तहसीलदार ...

Gurav community from Aundh donates 10 beds to the government! | औंध येथील गुरव समाजाकडून शासनाला १० बेडची मदत!

औंध येथील गुरव समाजाकडून शासनाला १० बेडची मदत!

Next

औंध : खटाव तालुक्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता शासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री यमाईदेवीचे गुरव-पुजाऱ्यांनी १० बेड तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

कोरोनाच्या या भयानक परिस्थितीत आपणही एक पाऊल पुढे टाकून मदत करावी, या भावनेतून मदत सर्वांनी करण्याचे ठरविले. पुजारी गतवर्षीही सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना समाजामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. गरजू लोकांना किराणा माल, शिधा देण्यात आला होता. त्याचप्रमाणे कोविड योद्ध्यांना ड्रायफ्रुट्स, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज आदी वस्तू देण्यामध्ये ही समाजाचा सहभाग होता.

कोविडबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता व बेडचा तुटवडा लक्षात घेता, गुरव समाजाने ही मदत शासनाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी, तलाठी निनाद जाधव, मंडल कृषीधिकारी अक्षय सावंत, रमेश गुरव, सागर गुरव, हनुमंत गुरव, तेजस गुरव, अमोल गुरव, संदीप गुरव, शैलेंद्र गुरव, गणेश गुरव, सचिन पछाडे, सोहम गुरव, राजेंद्र गुरव, शालन साठे, अवधूत गुरव, सादिगले उपस्थितीत होते.

Web Title: Gurav community from Aundh donates 10 beds to the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.