गुरू - शिष्याच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:25+5:302021-07-23T04:23:25+5:30
अंगापूर : गुरूंप्रति आदरभाव व ऋण व्यक्त करण्यासाठी ‘क्लासमेन्ट ग्रुप १९८७-८८ न्यू इंग्लिश स्कूल, अंगापूर’ यांच्यावतीने बोरगाव ...
अंगापूर : गुरूंप्रति आदरभाव व ऋण व्यक्त करण्यासाठी ‘क्लासमेन्ट ग्रुप १९८७-८८ न्यू इंग्लिश स्कूल, अंगापूर’ यांच्यावतीने बोरगाव येथे ‘गुरूमहिमा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून गुरू-शिष्यांच्या आठवणींना तेहतीस वर्षांनंतर उजाळा मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. ए. शितोळे होते. यावेळी नवनाथ कणसे म्हणाले, ‘गुरू-शिष्य महिमा आपल्या संस्कृतीमध्ये श्रेष्ठ आहे. गुरूंविषयी नेहमीच स्नेह, प्रेम, आदरभाव असला पाहिजे. तो वृध्दिंगत व्हावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्नेहमेळाव्यामुळे ३२-३३ वर्षांनंतर उपस्थित सवंगड्यांना गुरूंच्यासमवेत आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली. अंगापूर नगरीत संस्कारक्षम आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम बी. ए. शितोळे, एस. एस. निकम, ए. टी. ढाणे, एस. आर. घाडगे, ए. टी. निकम, बी. एन. घोरपडे, डी. एम. निकम, एन. के. लोखंडे, टी. एस. घाडगे तसेच एस. बी. अवसरे या शिक्षकांनी केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या पायावर भक्कमपणे उभे आहेत, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी डॉ. शरद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो : २२ बोरगाव
अंगापूर येथील १९८७-८८ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बोरगाव येथे पार पडला. (छाया : संदीप कणसे)