कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीत 'गुरुजन एकते'चा विजय!, संभाजीराव थोरातांच्या नेतृत्वाखालील पँनेलची बाजी

By प्रमोद सुकरे | Published: January 2, 2023 07:18 PM2023-01-02T19:18:15+5:302023-01-02T19:29:11+5:30

गेले अनेक दिवस लांबली होती निवडणूक

Gurujan Ekta Panel led by teacher leader Sambhajirao Thorat won in Karad Patan Taluka Teachers Society | कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीत 'गुरुजन एकते'चा विजय!, संभाजीराव थोरातांच्या नेतृत्वाखालील पँनेलची बाजी

कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीत 'गुरुजन एकते'चा विजय!, संभाजीराव थोरातांच्या नेतृत्वाखालील पँनेलची बाजी

googlenewsNext

कराड : गेले अनेक दिवस लांबलेल्या कराड - पाटण तालुका शिक्षक सोसायटीची निवडणूक रविवारी दि.१ रोजी झाली. आज सोमवारी कराड येथे त्याची मतमोजणी झाली. सुरुवातीला मतमोजणीत अत्यंत चुरशीने दिसणारी निवडणूक अंतिमतः शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील गुरुजन एकता पॅनलने सुमारे १५० च्या वर मतांनी जिंकली. निकालानंतर विजयी पॅनेलच्या उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला.

कराड- पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी शिक्षक संघ, समिती व इतर अनेक शिक्षक संघटना एकत्रित करीत 'गुरुजन एकता' पॅनेल रिंगणात उतरवले. तर त्या विरोधात शिक्षक नेते दिवंगत माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना मानणाऱ्या गटाने जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक महेंद्र जानुगडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत 'गुरुमाऊली' पॅनेल रिंगणात उतरवले होते. गेले १५ दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. अखेर रविवारी मतपेटीत निकाल बंद झाला. सोमवारी निकाल जाहीर झाला. त्यात गुरुजन एकतेचाच विजय झाल्याचे स्पष्ट झाले.

 गुरुजन एकता पॅनलचे विजयी उमेदवार :- 

भारत मारुती देवकांत, महादेव धनाजी दडस ,वनिता बजरंग अपशिंगे ,संतोष संपतराव यादव, दत्तात्रेय दादाराव जाधव, अंकुश बाबुराव नांगरे, प्रवीण भानुदास मोरे ,रमेश एकनाथ जाधव ,नीलम कासम नायकवडी, दिनेश दिनकर थोरात, सागर परशुराम पाटोळे, आनंदा बाळू चाळके, शशिकांत रामचंद्र तोडकर, धनाजी प्रल्हाद कोळी, रुक्मिणी मोहन सातपुते, वैशाली राजेंद्र पवार ,अनुसया दीपक पवार ,पल्लवी हनुमंत यादव

 गुरुमाऊली पॅनलचे पुरस्कृत विजयी उमेदवार:-  प्रदीप महादेव कुंभार

बिनविरोध उमेदवार 

यापूर्वी शंकर मोहिते( ढेबेवाडी) व संदीप संकपाळ (मसूर) हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ते गुरुमाऊली पॅनलचे नेतृत्व मानतात.

 दिनेश थोरात सर्वाधिक मतांनी विजयी 

उंडाळे गटातील उमेदवार दिनेश दिनकर थोरात यांना सर्वाधिक म्हणजे १८०० मते मिळाली. सुमारे १ हजार ५०० मताच्या फरकांने ते विजयी झाले.

शिक्षक सोसायटीच्या कारभारात चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांना सभासदांनी प्रायचित्त दिले आहे. यातून ते बोध घेतील अशी आशा आहे. नवनिर्वाचित संचालकांना माझ्या शुभेच्छा आहेत.- संभाजीराव थोरात शिक्षक नेते 


 कराड पाटण शिक्षक सोसायटी निवडणुकीत राज्यस्तरावरचे नेते व सर्व संघटना एकत्रित येऊन त्यांनी पॅनेल टाकले होते. त्यांच्या विरोधात आम्ही लढलो. मात्र आम्हाला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.  आमचे काम यापुढेही सुरूच राहील. - महेंद्र जानुगडे  संचालक, जिल्हा शिक्षक बँक (गुरुमाऊली पॅनेल)
 

Web Title: Gurujan Ekta Panel led by teacher leader Sambhajirao Thorat won in Karad Patan Taluka Teachers Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.