मसूर येथील दीक्षित संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:08+5:302021-07-30T04:40:08+5:30
मसूर : मसूर (ता. कऱ्हाड) येथील दीक्षित संगीत विद्यालयात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात झाला. यादिवशी हरिभक्त परायण मधुकर दीक्षित महाराज ...
मसूर : मसूर (ता. कऱ्हाड) येथील दीक्षित संगीत विद्यालयात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात झाला. यादिवशी हरिभक्त परायण मधुकर दीक्षित महाराज मसूरकर यांचे सर्व शिष्यांनी आशीर्वाद घेतले.
यावेळी हरिभक्त परायण मधुकर दीक्षित महाराज यांनी संगीताविषयी मार्गदर्शन करताना संगीत ही कला असून, कलेची साधना केल्याने ती समृद्ध होते व आजच्या धकाधकीच्या जीवनात संगीत आपल्या मनाला आनंद देण्याचे काम करते. त्यामुळे सर्वांनी दररोजचा एक तास तरी त्याचा सातत्याने सराव करणे गरजेचे आहे, तरच ही कला आपल्याला आत्मसात होऊ शकते, असे सांगितले.
यादिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन गायक किरण भोसले, शिवाजी जाधव (तासवडे), नामदेव काशीद (निगडी), दयानंद चव्हाण (खराडे), बापूसाहेब फडतरे (बेलवाडी), अनिकेत इंगळे (कांबीरवाडी), ओंकार थोरात (हणबरवाडी), राजाई महिला भजनी मंडळ, मसूर, किशोर दीक्षित, वैशाली दीक्षित आणि आदित्य कांबिरे (मसूर) व दीक्षित संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम सादर केला. दयानंद चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.