पुसेगावात दोन लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:00+5:302021-03-06T04:38:00+5:30
पुसेगाव : पुसेगाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. लोंढे व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत ...
पुसेगाव : पुसेगाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. लोंढे व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत पुसेगाव व निढळ येथील दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनाने गुटखा पान मसाला, सुगंधी सुपारी याचे उत्पादन साठा व वितरण किंवा विक्री यावर बंदी घातली असतानाही निढळ तेथील सिद्धार्थ संजय भिसे व पुसेगाव येथील आनंदा रामचंद्र चव्हाण (रा. नेर) यांनी सुमारे १ लाख ९८ हजार ६३२ रुपये किमतीच्या गुटख्याचा माल जवळ बाळगला होता.
पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.