पुसेगावात मेघगर्जनेसह गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:22+5:302021-04-28T04:43:22+5:30

पुसेगाव : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुसेगाव परिसरात झालेल्या पावसाने दिलासा दिला. गारा, वादळी ...

Hail with thunder in Pusegaon | पुसेगावात मेघगर्जनेसह गारपीट

पुसेगावात मेघगर्जनेसह गारपीट

Next

पुसेगाव : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुसेगाव परिसरात झालेल्या पावसाने दिलासा दिला. गारा, वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे दीड तास पुसेगाव व परिसराला चांगलेच झोडपून काढले.

जनावरांसाठी वर्षभर पुरेल अशा लावलेल्या कडब्याच्या गंजी झाकल्या नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांची नांगरट अजूनही झाली नसल्याने, वापसा येण्याची वाट पाहावी लागणार आहे, तसेच उन्हाचा तडाखा वाढल्याने गृहिणींनी सुरू केलेल्या उन्हाळी कामांना या पावसाने ब्रेक लागला आहे. चैत्राच्या कडक उन्हात वाळवण्यासाठी घातलेली ज्वारी व गहू यासारखी वाळवणे गोळा करताना, अचानक आलेल्या पावसाने लोकांची भंबेरी उडाली. जोरदार वाऱ्याने शेतातील अनेक झाडे उन्मळून पडली, तर जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. पुसेगाव परिसरात सध्या आले पिकाची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत करताना, या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे आले लागण ही पुढे ढकलली जाईल, अशी शक्यता आहे.

Web Title: Hail with thunder in Pusegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.