अधिकाऱ्यांसाठी गाड्या घालताहेत हेलपाटे

By admin | Published: March 9, 2015 09:41 PM2015-03-09T21:41:01+5:302015-03-09T23:48:25+5:30

पाटण तालुका : अधिकाऱ्यांना करमेना, मुक्काम कऱ्हाड, साताऱ्यात

Hailpots hiring cars for officers | अधिकाऱ्यांसाठी गाड्या घालताहेत हेलपाटे

अधिकाऱ्यांसाठी गाड्या घालताहेत हेलपाटे

Next

पाटण : पाटणला राहायचे मग पाच आकडी पगार असून, काय कामाचा? या मानसिकतेमुळे पाटण तालुक्यात विविध खात्यांचा कार्यभार पाहणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी कामाची वेळ संपली की कऱ्हाड, सातारा ऐवढेच नव्हे तर पुण्याकडे मुक्कामाला जाताना दिसतात, अशा अधिकाऱ्यांना ने-आण करण्यासाठी शासनाची गाडी आणि चालक हेलपाटे घालताना दिसतात.
पाटण तालुका दुर्गम डोंगराळ, येथे वास्तव्यास राहायचे म्हणजे भौतिक, सुख, सुविधांची वानवा, हायफाय, राहणीमानाचा उपभोग घेता येत नाही. तालुक्यात कार्यरत असणारे अधिकाऱ्यांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी पाटणमध्ये मुक्काम करतात. त्यांनादेखील कधी जोडून सुटीचा दिवस उजाडतोय, अशी गडबड असते. मात्र, रोज ये-जा करून पाटण तालुक्यात ड्यूटी करणारे अपडाऊन करताना ७० ते १०० किलोमीटरचा प्रवास करतात. शासनाची गाडी असल्यामुळे प्रवास खर्चाचा बोजा स्वत:वर येण्याचा प्रश्न उरत नाही.
अशा अपडाऊनमुळे फटका बसतोय तो सर्वसामान्य जनतेला. कारण रोज ७० किलोमीटरचा
प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता दिवसभर
टिकून राहीलच, याची शाश्वतीे नसते.
पाटण तालुक्यात अजूनही बऱ्याच शासकीय कार्यालयात बायोमॅट्रिक यंत्राची हजेरी लागू नाही आणि असेलच तर संबंधित खातेप्रमुखाला त्याच्या लेट उपस्थितीबाबत कोण विचारणार? (प्रतिनिधी)


घरी जायचे म्हणून पळवाट
शासकीय कार्यालयातील कामकाजाची वेळ संपण्यासाठी तासाभराचा अवधी बाकी असतानाच बरेच अधिकारी व कर्मचारी काहीतरी कामाचे निमित्त काढून कार्यालय सोडतात, अशा कर्मचाऱ्यांचे दर्शन कऱ्हाडहून येताना बऱ्याचवेळा होते.

याबाबत खासगी विचारले असता अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पाटणला नेमणूक म्हटले की, ते अगोदरच नाक मुरडतात. त्यापेक्षा गजबजलेल्या शहरात काम करायला आवडते. पाटणला कुटुंब आणायचं म्हटलं की मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या क्लासची अडचण. कारण पाटणला वेगवेगळ्या चॉईसच नाहीत. राहायचे झाले तर प्रशस्त रूम शोधावी लागते, ती मिळत नाही.

Web Title: Hailpots hiring cars for officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.