पंधरा दिवसांत दुधाचे दर वाढविणार : महादेव जानकर-दिवडमध्ये जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:26 PM2018-05-02T23:26:02+5:302018-05-02T23:26:02+5:30

म्हसवड : ‘चाळीस वर्षांत बारामतीकरांनी माण तालुक्यासाठी काय केले? हे जनतेला माहीत आहे. दुष्काळी जनता पाण्यासाठी एकवटली असताना आता दुधाचे दर कोसळल्याने

 Half of the day will increase milk prices: Mahadev Jankar and Jalpujan in Dewan | पंधरा दिवसांत दुधाचे दर वाढविणार : महादेव जानकर-दिवडमध्ये जलपूजन

पंधरा दिवसांत दुधाचे दर वाढविणार : महादेव जानकर-दिवडमध्ये जलपूजन

Next
ठळक मुद्देपाणी योजनांसाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही

म्हसवड : ‘चाळीस वर्षांत बारामतीकरांनी माण तालुक्यासाठी काय केले? हे जनतेला माहीत आहे. दुष्काळी जनता पाण्यासाठी एकवटली असताना आता दुधाचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पंधरा दिवसांतच दुधाचे दर वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच उरमोडीसह विविध योजनांसाठी शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन विकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.
माण तालुक्यातील दिवड गावात उरमोडी नदीत जलपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनिल देसाई, मामूशेठ वीरकर, डॉ. प्रमोद गावडे, भाऊसाहेब वाघ, विश्वंभर बाबर, बाळासाहेब मासाळ, तानाजी काटकर, अप्पासो पुकळे, दादा दडस, पिंटू जगदाळे, संदीप भोसले, जोतिराव जाधव, बबन वीरकर, दादासाहेब दोरगे, आकाश दडस आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री जानकर म्हणाले, ‘शेतकºयांनी आपला माल थेट बाजारातून जाऊन विकला पाहिजे. १९९५ रोजी युती सरकारने उरमोडी योजना सुरू केली. दळणवळण वाढण्यासाठी सातारा ते पंढरपूर हा रस्ता लवकर पूर्ण होणार आहे. शेतकºयांसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा अभ्यास करून प्रत्यक्षात लाभ घेतला पाहिजे. माण तालुक्यामधील दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी आपण सगळ्यांनी श्रमदानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले पाहिजे.’
भाजप उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, ‘चंद्र्रकांत पाटील व महादेव जानकर हे दोन मंत्री पाणीदार मंत्री आहेत. मंत्री जानकर यांच्या माध्यमातून माण तालुक्यातील विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळणार आहे. या युती सरकारने आपली गरज पाहून पाणी सोडले. केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे.’ कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

पाणी फाउंडेशनच्या कामांना मदत
दिवड गावातील पाणी फाउंडेशनच्या कामासाठी चंद्रकांत पाटील आणि सातारा जिल्हा भाजपच्या वतीने तीनशे लिटर डिझेल उपलब्ध करून देण्यात आहे. लोकसहभागातून चालणाºया कार्यक्रमांना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली.

Web Title:  Half of the day will increase milk prices: Mahadev Jankar and Jalpujan in Dewan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.