अवैध बांधकामांवर हातोडा

By admin | Published: February 25, 2016 03:13 AM2016-02-25T03:13:13+5:302016-02-25T03:13:13+5:30

नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मौजा सक्करदरा व मानेवाडा भागात करण्यात आलेले अवैध बांधकाम बुधवारी हटविले.

Hammer on illegal construction | अवैध बांधकामांवर हातोडा

अवैध बांधकामांवर हातोडा

Next

नासुप्र व महापालिके ची कारवाई : बाराखोली भागात विरोध
नागपूर : नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मौजा सक्करदरा व मानेवाडा भागात करण्यात आलेले अवैध बांधकाम बुधवारी हटविले.
सक्करदरा येथील खसरा क्रमांक ७७ मधील भूखंड क्रमांक १३ वरील अयोध्यानगर को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील राजीव धार्मिक यांनी पार्किंगच्या जागेत अवैध बांधकाम केले होते, ते तोडण्यात आले. धार्मिक यांच्याकडून ५० हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. नंतर पथकाने आपला मोर्चा मौजा मानेवाडा येथील एकमत को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील अवैध बांधकामाकडे वळविला. येथील भूखंड ४१ व ४२ वर संदीप देशपांडे यांनी नासुप्रची अनुमती न घेता चार मजली इमारत उभारली आहे. अवैध बांधकाम हटविण्यासंदर्भात नासुप्रने त्यांना २१ नोव्हेंबर २०१५ रोजी नोेटीस बजावली होती. परंतु त्यांनी अवैध बांधकाम न हटविल्याने नासुप्रने इमारतीच्या बाल्कनीवर बुलडोजर चालविला. त्यांना बांधकाम नियमित करण्यासाठी २० दिवसांची मुदत देण्यात आली. त्यांच्याकडून ५०हजार रुपये दंड व १ लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात आले. तसेच भवानी सभागृहासमोरील चिकन सेंटर, भाजी विक्रेते , पानठेले व चहा विके्र त्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)

बाराखोली परिसरात तणाव
महापालिके च्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी झोनमधील जुना कब्रस्तान ते भीमचौक, राजभवन चौपाटी परिसर, बाराखोली परिसरातील अस्थायी दुकाने हटविली. बाराखोली येथील सखल भागात बनविलेला उंचवटा हटविण्याला नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या परिसरातील दुकानदारांनी अतिक्रमण करून उभारलेले शेड हटविण्यात आले. राजभवन लगतच्या काटोल मार्गावरील भाजी विक्रेते व चहा टपऱ्यांचे अतिक्रमण हटविले. ही कारवाई सहायक आयुक्त महेश धामेचा , अशोक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच नेहरूनगर झोनच्या कारवाईत नंदनवन येथील पांडव कॉलेजच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.

Web Title: Hammer on illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.