महाबळेश्वरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; रविवारी पहाटे ६ वाजताच कारवाईला सुरुवात
By प्रमोद सुकरे | Published: March 10, 2024 08:24 AM2024-03-10T08:24:54+5:302024-03-10T08:25:46+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला आहे. रविवारी पहाटे ६ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.
सातारा -महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करा अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार रविवारी दि.१० मार्च रोजी पहाटे प्रशासनाने येथील अनाधिकृत बांधकामांवर हातोडा टाकला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला आहे. रविवारी पहाटे ६ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईत प्रांताधिकारी राजेंद्र जाधव,तहसिलदार तेजिस्विनी पाटील व सर्व प्रशासकीय विभिगाचे अधिकारी ,कर्मचारी यांच्या सहभाग आहे.या कारवाईनेअनाधिकृत बांधकाम असणाऱ्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. गुरेघर परिसरात ही कारवाई सुरू असून सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला अशा तीन इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या आहेत.