करणीच्या बाहुल्यांना अंनिस घालणार हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:28 PM2017-12-29T23:28:00+5:302017-12-29T23:28:00+5:30

Hand to the dolls of action | करणीच्या बाहुल्यांना अंनिस घालणार हात

करणीच्या बाहुल्यांना अंनिस घालणार हात

Next


सातारा : हिरव्यागार वनराजाला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाºया प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकले
आहे. शनिवारी (दि. ३० डिसेंबर) वाई तालुक्यातील मांढरगडावर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्या जाणार आहेत.
मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा दि. १, २ व ३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. इथे पशुबळी अथवा लिंबू, बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे हा या कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील मांढरदेवगडावर असे प्रकार होताना सर्रासपणे दिसतात.
मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस बरीचशी झाडे आहेत. त्या झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून खिळे ठोकले जातात. अशा अघोरी प्रथा करून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्त प्रमाणात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. तरी या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे. असे अघोरी प्रकार होत असतील तर
त्याला प्रतिबंध करण्याचा
अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेता येऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर अंनिसतर्फे वाई पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले असून, ३० डिसेंबर रोजी करणीच्या नावाने झाडांना ठोकलेल्या बाहुल्या काढण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
मांढरदेव परिसरात नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी आधीच स्पष्ट केले आहे. आता तरीही असा अघोरी प्रकार होत असेल तर पोलिसांनाच संबंधितांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना आखावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट यांची ३०० लोकांची प्रशिक्षित टीम येथे २४ तास असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व विभागांचा या यात्रेदरम्यान योग्य तो समन्वय राहावा, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने एकूण सोळा वॉकीटॉकी संचही दिले जाणार आहेत. देवस्थान विश्वस्थांमार्फत नियंत्रण कक्ष स्थापने, पशुहत्या बंदीबाबत सर्वत्र फलक लावण्यात येणार असून, यात्रेनिमित्त मांढरगडावर साफसफाईसाठी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.
हिरवी झाडे घायाळ
हिरव्या झाडांना खिळे ठोकून करणीच्या काळ्या बाहुल्या लावल्या जातात. हा प्रकार अतिशय अघोरी आहे. तसेच तो भय उत्पन्न करणाराही आहे. हिरवीगार वनराई घायाळ होत आहे.

Web Title: Hand to the dolls of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.