हात निखळलेल्या श्रावणीला मदतीचा ‘हात’!

By admin | Published: November 29, 2015 11:33 PM2015-11-29T23:33:04+5:302015-11-30T01:18:19+5:30

माणुसकीची ठेव : भापकर यांच्याकडून वाढदिवसाची रक्कम अपघातग्रस्त बालिकेच्या नावे -- गुड न्यूज

Hands to help a handful of drowsy hands! | हात निखळलेल्या श्रावणीला मदतीचा ‘हात’!

हात निखळलेल्या श्रावणीला मदतीचा ‘हात’!

Next

मुराद पटेल --शिरवळ -देणाऱ्याने देत जावे... या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आदेश भापकर व मिञ परिवाराने लोहोम येथील अपघातग्रस्त श्रावणी राजेंद्र वाडकर या चिमुकलीला तिच्या भविष्यासाठी पन्नास हजारांची मदत केली. दुर्दैवाचा वज्राघात सहन करत असलेल्या श्रावणीसाठी भापकर यांनी ठेवीच्या रूपाने जणू माणुसपणाचीच ‘ठेव’ दिल्याची भावना वाडकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.श्रावणी वाडकर हिचा हात तेलाच्या घाण्यात अडकल्यामुळे दुखावला होता. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, खांद्यापासून हात निखळला गेल्याने संपूर्ण हात श्रावणीला गमवावा लागला.दरम्यान, याबाबतची माहिती आदेश भापकर व उपसरपंच उदय कबुले व मित्र परिवाराला मिळताच त्यांनी तातडीने निर्णय घेत आदेश भापकर यांच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत श्रावणी वाडकर हिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलत ५० हजार दोनशे रुपयांची ठेव दहा वर्षाच्या मुदतीवर शिरवळ येथील शिवप्रेरणा पतसंस्थेमध्ये ठेवली. श्रावणीला ठेव पावतीची मुदत संपल्यानंतर एक लाख पंचवीस हजारांचा परतावा मिळणार आहे.आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते शिरवळ येथे श्रावणी वाडकर हिला ठेवपावती देण्यात आली. यावेळी आदेश भापकर, उपसरपंच उदय कबुले, बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, चंद्रकांत मगर, विजय पवार, चेतन बेलापूरकर, मोहन सोनावणे, काका राऊत, बाळासाहेब जाधव, राजेश शेटे, मधुकर आंबवले, पिंटू दळवी, आत्माराम पिसाळ, स्वप्नील जाधव, राजेंद्र वाडकर, संतोष पाटील आदी उपस्थित होते.


आमदारांकडूनही मदतीचा शब्द
शिरवळ येथे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते ठेव पावतीचा धनादेश श्रावणी वाडकर हिला देण्यात आला. या कार्यक्रमात आ. मकरंद पाटील यांनीही श्रावणीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
असा घडला अपघात...
लोहोम, ता. खंडाळा येथील श्रावणी राजेंद्र वाडकर ही सहा वषार्ची चिमुकली आईसमवेत शेंगदाणे तेल गाळण्यासाठी घाण्यावर गेली होती. खेळत असताना श्रावणीने अंगावरील ओढणी हाताला गुंडाळून गोल फिरवत होती. ती ओढणी अचानकपणे घाण्यामध्ये अडकून श्रावणीचा ओढणीसह हातही घाण्यामध्ये अडकल्याने हात खाद्यापासून निखळला.

Web Title: Hands to help a handful of drowsy hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.