नवऱ्याच्या हाती फावडे...नवरीच्या हातात पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:50 PM2018-04-29T23:50:43+5:302018-04-29T23:50:43+5:30

In the hands of the husband, the shovel ... the bride in the hand | नवऱ्याच्या हाती फावडे...नवरीच्या हातात पाटी

नवऱ्याच्या हाती फावडे...नवरीच्या हातात पाटी

Next

सागर बाबर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुकुडवाड : महाराष्ट्रीयन परंपरेनुसार नवीन लग्न झाल्यानंतर दुसºया दिवशी कुलदैवत देव देवतांच्या दर्शनासाठी नवरा नवरी जाण्याची परंपरा या महाराष्ट्रात सध्या चालू आहे. मात्र माण तालुक्यातील शिवाजीनगर (कुकुडवाड) येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाच्या दुसºयाच दिवशी देवदर्शनासाठी जाण्याऐवजी नवरदेव सोमनाथ यांनी असा निश्चय केला की नेहमीप्रमाणे आधी सकाळी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन नवरदेव सोमनाथ व नवरी नीता यांनी हातात फावडे अन पाटी घेऊन जोडीने एकत्र श्रमदान केले व नंतर ते देव दर्शनासाठी गेले.
माण तालुक्यातील शिवाजीनगर येथील नवरदेव सोमनाथ पंढरी भोसले याचे होळीचेगाव, ता. खटाव येथील नीता बाबासाहेब जगताप यांचा नुकताच विवाह सोहळा शिवाजीनगर येथे पार पडला. सध्या तालुक्यात गावागावात पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धेचे तुफान आले आहे, असे असताना सोमनाथ व नीता या दोघांनी देव दर्शनाला जाण्यापूर्वी आपल्या शिवारात लोकांच्या समवेत हातात फावडे पाटी घेऊन जोडीने श्रमदान केले.
पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा कुकुडवाड अंतर्गत शिवाजीनगर येथील लोकांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून श्रमदानची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. असे असताना आपण घरी न बसता नवविवाहित नवदाम्पत्य यांनी इतर लोकांचा समवेत जाऊन श्रमदानाच्या ठिकाणी जोडीने लग्नातील पोषाखात श्रमदान केले.
भविष्यात पाणीदार शिवाजीनगर गावचे आपणही साक्षीदार असू, या भावनेने व गावप्रेमापोटी लग्नाच्या दुसºयाच दिवशी मांडवातून नवरा नवरी फावडे, पाटी, टिकाव घेऊन थेट श्रमदानाच्या ठिकाणी पोहचले. सकाळी दोन तास भर उन्हात या नवदाम्पत्यांनी श्रमदान केले. नंतर नववधूची माणदेशी मातीने ओटी भरण्यात आली.
सत्यमेव जयते संगे दुष्काळावर मात
दुष्काळावर मात करण्यासाठी येथील जनता जीवाचा आटापिटा करत आहे. नक्कीच दुष्काळाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या ‘सत्यमेव जयते’ पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने दुष्काळावर मात करण्यासाठी या नवदाम्पत्याने आपला जोडीने सहभाग नोंदवून केलेल्या कार्याची जाण येथील जनतेला करून दिली. या त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: In the hands of the husband, the shovel ... the bride in the hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.