डोक्यावर लटकतोय ‘काळ’ : कºहाडात अंतर्गत रस्त्यावरील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:29 AM2019-01-10T00:29:33+5:302019-01-10T00:30:03+5:30

कºहाडातील नागरिक व पक्ष्यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. शहरात अंतर्गत भागात रस्त्याकडेला व घरांवर विद्युत तारा खाली आल्या आहेत. या तारांतील विद्युत प्रवाहामुळे वटवाघळेही

Hanging on the head 'Kal': The condition of the road under the bone | डोक्यावर लटकतोय ‘काळ’ : कºहाडात अंतर्गत रस्त्यावरील स्थिती

डोक्यावर लटकतोय ‘काळ’ : कºहाडात अंतर्गत रस्त्यावरील स्थिती

Next
ठळक मुद्देविद्युत तारांमुळे धोका ; पक्ष्यांचा जीवही धोक्यात

कºहाड : कºहाडातील नागरिक व पक्ष्यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. शहरात अंतर्गत भागात रस्त्याकडेला व घरांवर विद्युत तारा खाली आल्या आहेत. या तारांतील विद्युत प्रवाहामुळे वटवाघळेही मृत्युमुखी पडली आहेत. शहरात पावलोपावली डोक्यावर ‘काळ’ लटकत आहे.

शहरात महावितरणच्या रस्त्याच्या बाजूने घरगुती विद्युत तारांची लाईन गेली आहे. शहरात कुठे सहा तर कुठे दहा फुटांवर विद्युत तारा खाली लोंबकळत आहेत. कºहाड पोस्ट आॅफिस कार्यालयापासून ते पाण्याच्या टाकीकडे जाणारा मार्ग, जुने जलशुद्धीकरण केंद्र परिसर, पालिका भाजी मंडई इमारत परिसर अशा ठिकाणी सध्या अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या खांबावरील विद्युत तारा या खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण होत आहे. शहरात घरगुती, खासगी कंपनी तसेच छोट्या उद्योगांना महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. शहरातील दत्तचौक ते चावडी चौक या मार्गावर नेहमीच ट्रक तसेच चारचाकी वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर ठिकठिकाणी विद्युत तारा या खाली आल्या असून, त्या अधूनमधून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना थटत आहेत. तर काही ठिकाणी घरांच्या छतावरून अवघ्या अर्ध्या ते एक फुटावरून या तारा गेलेल्या आहेत.

लोंबकळणाºया तारांची उंची वाढविण्याबाबत नागरिकांनी वीजवितरणच्या अधिकाºयांकडे मागणी केली आहे. तरी याकडे दुर्लक्ष होते आहे. शहरात काही ठिकाणी वीजवितरण कंपनीने जोडणीवेळी उकरलेल्या तारा या तशाच जमिनीवर ठेवलेल्या आहेत.


मिरवणुकीतही होतो तारांचा अडथळा
शहरात धार्मिक कार्यक्रम तसेच सण, उत्सव व जयंती यानिमित्त चित्ररथ तसेच पालखींची मिरवणूक काढल्यास त्या चित्ररथांना खाली लोंबकळत असलेल्या या विद्युत तारा अडथळा देत असतात. त्यावेळी नागरिकांकडून लाकडी बांबूच्या साह्याने त्या तारा वर उचलल्या जातात.
तारांमध्ये अडकून पाखरांचाही जातोय जीव
कºहाड शहराला कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम लाभला आहे. या ठिकाणी नदी व वृक्षांची संख्या जास्त असल्याने पक्षीही मोठ्या प्रमाणात येतात. खासकरून वटवाघूळ हे पक्षी शहरातील प्रीतिसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ परिसरातील वृक्षांवर जास्त आढळतात. या पक्ष्यांच्या जीवासही धोका निर्माण होत आहे. शहरात भाजी मंडई परिसरात विद्युत तारांच्या प्रवाहाच्या धक्क्यामुळे वटवाघळे मृत्यू पावली आहेत.

Web Title: Hanging on the head 'Kal': The condition of the road under the bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.