कुडाळ ग्रामपंचायतीत त्रिशंकू स्थिती..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:16+5:302021-01-19T04:39:16+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. कुडाळच्या जनतेने कोणत्याही ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. कुडाळच्या जनतेने कोणत्याही पॅनेलला बहुमत न दिल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
उपसभापती सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनेलला सर्वाधिक ७ जागा, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या समर्थ पॅनेलला ४ जागा तर हेमंत शिंदे यांच्या बहुजन विकास आघाडीला ४ जागा मिळाल्या आहेत. कुडाळकर जनतेने दिलेला कौल पाहता बहुमतासाठीचा ८ हा आकडा कोणत्याही पॅनेलला गाठता आला नाही. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या राजकीय घडामोडी घडतील व सत्तास्थापनेचा दावा केला जाईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
कुडाळमधील तिन्ही पॅनलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते हनुमान वार्डमध्ये धैर्यशील शिंदे ३३४, जगन्नाथ कचरे ३३६, मनीषा नवले ३६०, शिवाजी वाॅर्डात - दत्तात्रय कांबळे ३०५, सुरेखा कुंभार ३०२, जयश्री शेवते ३४१ व नेताजी वाॅर्डात दिलीप वारागडे २९२ हे सर्व ७ रयत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच नेताजी वाॅर्डात राहुल ननावरे ३२७,लक्ष्मी वाॅर्डातून वीरेंद्र शिंदे ३८०, गौरी शिराळकर ३३३, रूपाली कांबळे ३११ या समर्थ पॅनेलच्या ४ उमेदवारांचा विजय झाला आहे. तर तानाजी वॉर्डमधून सोमनाथ कदम ३१०, सुधा रासकर ३०६, प्राजक्ता शिंदे ३८८ व नेताजी वाॅर्डमधून अर्चना वारागडे ३१६, या कुडाळ बहुजन विकास आघाडीच्या ४ उमेदवारांचा विजय झाला आहे.
सरताळे येथे निशांत नवले २८४, दिनेश गायकवाड २३९, बारीकराव कदम २१२, सुनील धुमाळ २३९, सारिका गुठाळे २६० हे विजयी झाले असून, अमृता जाधव, सोनाली पवार, रोशना नवले, सूचिता काळे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या होत्या. तर सर्जापूरमध्ये देवीदास बोराटे (२८३), शंकर मोहिते (११३), मयूर बाबर (१२२), सुरेखा मोहिते (११०) विजयी तर स्वागता बोराटे, मनीषा बोराटे, सारिका मोहिते हे बिनविरोध निवडून आले आहेत.