साताऱ्यात तीन लाखांसाठी विवाहितेचा जाचहाट, पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:46 PM2024-05-30T12:46:30+5:302024-05-30T12:47:21+5:30
सातारा : नावावर खोली करण्यासाठी आई-वडिलांकडून तीन लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहिता अक्षदा सुनील जाधव (वय २८, रा. ठाणे ...
सातारा : नावावर खोली करण्यासाठी आई-वडिलांकडून तीन लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहिता अक्षदा सुनील जाधव (वय २८, रा. ठाणे सध्या रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा जाचहाट करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती सुनील जाधव, दीर पांडुरंग जाधव, चुलत दीर नितीन जाधव, नणंद गाैरी जाधव, सासू अनुसया जाधव, सासरे यशवंत जाधव (सर्व रा. ठाणे दिवा, मूळ रा. घाटेवाडी, पो. मालोशी, ता. पाटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांनी ठाणे दिवा येथे विवाहिता अक्षदा यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. हा प्रकार ३ एप्रिल २०२१ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. हवालदार दळवी हे अधिक तपास करीत आहेत.