जैवविविधतेचा ऱ्हास हानिकारक : रूपेश यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:08+5:302021-09-26T04:42:08+5:30

फलटण : ‘विकास सर्वांना हवा असतो; परंतु विकासाला दुसरी बाजू असते. कोणत्याही शहराचा किंवा गावाचा विकास होत असताना पर्यावरणाचा ...

Harmful to biodiversity loss: Rupesh Yadav | जैवविविधतेचा ऱ्हास हानिकारक : रूपेश यादव

जैवविविधतेचा ऱ्हास हानिकारक : रूपेश यादव

Next

फलटण : ‘विकास सर्वांना हवा असतो; परंतु विकासाला दुसरी बाजू असते. कोणत्याही शहराचा किंवा गावाचा विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी अन्नसाखळीचा बचाव करून जैवविविधता वाढविणे व तिचे रक्षण करणे गरजेचे असते,’ असे मार्गदर्शन डॉ. रूपेश यादव यांनी केले.

फलटणमधील एमआयडीसी परिसरात असलेले जॅक्सन इन हॉटेल गेल्या सहा दिवसांपासून जागतिक हरित इमारत आठवडा साजरा करीत आहे. या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणून डॉ. रूपेश यादव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

दिवसेंदिवस पर्यावरणातील होणारे बदल व त्या बदलांमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, पशू-पक्षी, प्राण्यांचा होणारा ऱ्हास, यावर जनजागृती करणे खूप महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने जॅक्सन इन फलटण यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याची जनजागृती व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेतला. आपल्या भागातील आढळणारे पशू-पक्षी त्यांचे महत्त्व आपल्या अन्नसाखळीशी कसे निगडित आहे, हे त्यांना पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन शैलेश राज्याध्यक्ष, शैला देंडे यांनी केले.

250921\img-20210925-wa0065.jpg

.

Web Title: Harmful to biodiversity loss: Rupesh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.