‘हरणाई’ने बांधिलकी जोपासली : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:39+5:302021-06-02T04:28:39+5:30

वडूज : कोरोना महामारीच्या युद्धात सैनिक म्हणून काम करताना आशा स्वयंसेविका सुरेखा गुरव यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा ...

‘Harnai’ cultivates commitment: Chavan | ‘हरणाई’ने बांधिलकी जोपासली : चव्हाण

‘हरणाई’ने बांधिलकी जोपासली : चव्हाण

Next

वडूज : कोरोना महामारीच्या युद्धात सैनिक म्हणून काम करताना आशा स्वयंसेविका सुरेखा गुरव यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी हरणाई उद्योग समूहाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मदतीचा हात पुढे करत रणजितसिंह देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

खातवळ (ता. खटाव) येथील आशा सवयंसेविका सुरेखा गुरव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार म्हणून पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक व काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अजित पाटील-चिखलीकर, अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, सत्यवान कांबळे, शंकर फडतरे, देवानंद फडतरे, सुनील फडतरे, नवनाथ फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना ५० लाख विम्याची तरतूद असली तरी आशा स्वयंसेविकांचा त्यामध्ये समावेश नसल्याने त्यांना ही शासकीय मदत मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यांना विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्यवान कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर देवानंद फडतरे यांनी आभार मानले.

Web Title: ‘Harnai’ cultivates commitment: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.