खटाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:09+5:302021-03-13T05:12:09+5:30
खटाव : रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीतून शेतकरी आता मोकळा होऊ लागला आहे आणि आता त्याची जनावरांसाठी वर्ष-सहा महिने पुरेल, ...
खटाव : रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीतून शेतकरी आता मोकळा होऊ लागला आहे आणि आता त्याची जनावरांसाठी वर्ष-सहा महिने पुरेल, अशा वैरणीची जुळवाजुळव करण्याची लगबग सुरू आहे.
ज्वारीचे पीक काढून झाल्यानंतर गडी लावून या वैरणीच्या पेंढ्या बांधून त्याचे माप घालून किंवा त्या मोजून शेतकरी किंवा व्यापारी घेत असतात. त्यामुळे या वैरणीच्या दरात कडबा बघून दर ठरविला जातो.
सध्या वैरणीचा दर पेंढी बघून ठरविला जात आहे. अडीच हजार ते तीन हजार रुपये शेकडा या दराने वैरण शेतातून खरेदी केली जात आहे; परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात बैलांची घटती संख्या पाहता वैरणीला नेहमीप्रमाणे मागणीही नाही. त्यातच ऊसतोडणी सुरू असल्यामुळे उसाचे वाडेही शेतकऱ्याला मिळत असल्याने शेतकरी तेही घेत आहेत. सध्या ट्रॅक्टरमधून वैरणीच्या पेंढ्यांची वाहतूक सुरू असून, शेतकरी तसेच व्यापारी दोघांची लगबग सुरू आहे.
१२खटाव
कॅप्शन : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आता वैरण साठवणुकीची लगबग सुरू आहे.