हातभट्टी : चार दिवसांत जिल्ह्यात ३१ छापे!

By Admin | Published: June 23, 2015 11:51 PM2015-06-23T23:51:52+5:302015-06-24T00:48:01+5:30

दारू दिली ओतून : ‘मालवणी’ दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय; लाखावर मुद्देमाल हस्तगत ---लोकमत विशेष

Hashabhatti: 31 raids in the district in four days! | हातभट्टी : चार दिवसांत जिल्ह्यात ३१ छापे!

हातभट्टी : चार दिवसांत जिल्ह्यात ३१ छापे!

googlenewsNext

राजीव मुळ्ये- सातारा  -मुंबईतील मालवणी भागात हातभट्टीच्या विषारी दारूने शंभरावर बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. ही दुर्घटना घडल्यापासून आतापर्यंत चार दिवसांत या विभागाने जिल्ह्यात तब्बल ३१ ठिकाणी छापे घातले आहेत. एक लाख दहा हजारांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मालवणी येथील विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात कोणती खबरदारी घेतली जात आहे, याची माहिती ‘लोकमत’ने घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागान मालवणी दुर्घटनेनंतर ३१ छापे घातले. तसे पाहता, पूर्वीच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात अगदीच तुरळक प्रमाणात हातभट्टीची दारू येते किंवा तयार केली जाते. महिलांनी केलेले आंदोलन, वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर छाप्यांमध्ये केलेली वाढ यामुळे हातभट्टीची दारू जवळजवळ हद्दपार झाली होती. मात्र, त्यानंतर कुठे-कुठे या व्यवसायाने तोंड वर काढले होते.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूधंदे सुरू असलेल्या ठिकाणांची माहिती या विभागाला मिळत असते. त्यानुसार दर आठवड्याला छाप्यांचे नियोजन केले जाते. नियमित छापासत्र सुरू होतेच; तथापि मालवणी दुर्घटना घडल्यानंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला. गेल्या चार दिवसांत अनेक हातभट्ट्यांवरील दारू नष्ट करण्यात आली असून १ लाख १० हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालकांनी सर्व अधीक्षकांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे. या विभागाकडील मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे पोलीस अधीक्षकांना विनंती करून पोलिसांच्या मदतीने छापासत्रे सुरू करावीत, असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार आता पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे छापे घालून उरलीसुरली हातभट्टी जिल्ह्यातून हद्दपार करण्यास सज्ज झाला आहे.


या ठिकाणांवर आहे नजर...
जिल्ह्यात हातभट्टीची दारू हल्ली अगदीच तुरळक ठिकाणी तयार होत असली किंवा विकली जात असली तरी फलटण, खंडाळा, माण, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात उत्पादन आणि विक्रीची अनेक ठिकाणे असल्याने या भागावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. नुकत्याच घातलेल्या छाप्यांमध्येही या भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
४फलटण : ढवळ, गुणवरे, मुंजवडी, बागेवाडी, साठेफाटा ४खंडाळा : वडगाव, पिसाळवाडी, शिरवळ, लोहोम, नायगाव, शिंदेवाडी, जवळे ४खटाव : पुसेगाव, खटाव, राजापूर, कातरखटाव, कलेढोण, मायणी ४माण : गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, शिंगणापूर, कुळकजाई, मोही, मार्डी, नरवणे, राणंद, बिदाल, आंधळी, पिंपरी, म्हसवड, काळचौंडी, वरकुटे-मलवडी, पळशी, नरबटवाडी, पुळकोटी, शिरताव ४कऱ्हाड : कार्वे ४पाटण : नाडे, कोयनानगर


हातभट्टीच्या दारूमध्ये काळा गूळ आणि नवसागर हे प्रमुख पदार्थ असतात. तेदोन्ही शरीराला घातक असतात. त्याव्यतिरिक्त दारूत कुजक्या फळांच्या रसापासून रसायनापर्यंत वाट्टेल ते मिसळले जाते. त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. मालवणीची दुर्घटना पाहता कोणीही असुरक्षित, अवैध दारूचे सेवन करू नये आणि आसपास विकली जात असेल, तर आम्हाला माहिती द्यावी.
- प्रदीप वाळुंजकर,
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

Web Title: Hashabhatti: 31 raids in the district in four days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.