सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, बदलीबाबत उलटसुलट चर्चा 

By दीपक देशमुख | Published: June 7, 2023 07:28 PM2023-06-07T19:28:20+5:302023-06-07T19:28:35+5:30

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी आदी कारणांवरून त्यांची बदली झाल्याची प्राथमिक माहिती

Hasty transfer of Satara Collector Rachesh Jayavanshi | सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, बदलीबाबत उलटसुलट चर्चा 

सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, बदलीबाबत उलटसुलट चर्चा 

googlenewsNext

सातारा : साताऱ्याचे जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुचेश जयवंशी यांनी यांनी महाबळेश्वर येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती आणि आजच त्यांच्या बदलीचे आदेश आले असल्यामुळे या बदलीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सातारा जिल्हाधिकारी म्हणून एक वर्षांपुर्वी रुचेश जयवंशी यांची पदभार हाती घेतला. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कोणताही बडेजाव न ठेवता त्यांनी जिल्हा प्रशासनच्या कामात गतिमानता आणली. महाराष्ट्र शासनाच्या आनंदाचा शिधा, प्रधानमंत्री पिक विमा योजना, शासन आपल्या दारी अशा अनेक अनेक योजना वेळेत पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत सुशोभिकरणाचे काही वेगाने सुरू आहे.

जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध असणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. कास परिसरातील बांधकामे, महाबळेश्वर पाचगणी कास मॅप्रोगार्डन बाबत घेतलेली कडक, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी आदी कारणांवरून त्यांची बदली झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Hasty transfer of Satara Collector Rachesh Jayavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.